नेपाळनंतर मादागास्करमध्ये सत्तांतराचा भूकंप, राष्ट्रपतींची हकालपट्टी; राजधानी लष्कराच्या ताब्यात, संसद विसर्जित

Last Updated:

Madagascar Massive Political Upheaval: मादागास्करमध्ये सत्तेचा स्फोटक उलथापालथ झाली आहे. राष्ट्रपती अँद्री राजोएलिनावर संसदेत महाभियोग मंजूर झाल्यानंतर सैन्याने राजधानी ताब्यात घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाने कर्नल मायकेल रांद्रियनिरिनाला हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्त केलं आहे.

News18
News18
अंतानानारिव्हो : हिंद महासागरातील द्वीपदेश मादागास्करमध्ये राजकीय उलथापालथ झाली असून देशात अक्षरशः सत्तेचा भूकंप झाला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक ऐतिहासिक आदेश देत सेना अधिकारी कर्नल मायकेल रांद्रियनिरिना (Colonel Michael Randrianirina) यांना हंगामी राष्ट्रपतीपद स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले आहे.
advertisement
ही घोषणा अशा वेळी करण्यात आली; जेव्हा कर्नल रांद्रियनिरिना यांनी सेनेच्या पाठिंब्याने सत्ता ताब्यात घेतल्याची घोषणा केली होती. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, विद्यमान राष्ट्रपती अँद्री राजोएलिना (Andry Rajoelina) आता आपले पद सांभाळण्यास असमर्थ आहेत, कारण त्यांनी देश सोडला आहे आणि देशातील सेना बंडखोरीच्या स्थितीत आहे. न्यायालयाने आदेश दिला की कर्नल रांद्रियनिरिना यांनी पुढील 60 दिवसांच्या आत नव्या निवडणुका घेऊन लोकशाही व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी.
advertisement
संसदेने महाभियोगाने राष्ट्रपती हटवले
मादागास्करच्या राष्ट्रीय सभेने (National Assembly) सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रपती अँद्री राजोएलिना यांच्याविरुद्ध महाभियोग ठराव (Impeachment Motion) मोठ्या बहुमताने मंजूर केला. या ठरावाला 130 खासदारांनी समर्थन दिले, तर फक्त एकाने मतदान केले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या स्वतःच्या पक्षातील (IRMAR) काही खासदारांनीही त्यांच्या विरोधात मत दिले. आता हा निर्णय हाय कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट (High Constitutional Court) कडे पाठवण्यात आला आहे, जे महाभियोगाची वैधता ठरवेल.
advertisement
सेनेने सत्ता ताब्यात घेतली
महाभियोगानंतर काही तासांतच परिस्थिती उलटली. राजधानी अंतानानारिव्होमध्ये एलीट CAPSAT युनिटचे प्रमुख कर्नल मायकेल रांद्रियनिरिना यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली,आम्ही सत्ता आपल्या हाती घेतली आहे.
मायकेल रांद्रियनिरिना यांनी स्पष्ट केले की, सेना आणि जेंडरमेरीच्या अधिकाऱ्यांनी मिळून एक ‘काउन्सिल’ तयार केली आहे. जी लवकरच पंतप्रधानांची नियुक्ती करेल आणि एक नागरिक सरकार (Civilian Government) स्थापन करेल. कर्नल रांद्रियनिरिना आणि त्यांची युनिट राष्ट्रपती भवनाबाहेर तैनात राहिली आणि तिथूनच त्यांनी सत्ता हस्तांतरणाची घोषणा केली. हीच ती युनिट आहे, जिने काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींचे आदेश पाळण्यास नकार दिला होता आणि प्रदर्शनकर्त्यांच्या बाजूने उभी राहिली होती.
advertisement
राष्ट्रपती देश सोडून पळाले
महाभियोग ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती अँद्री राजोएलिना यांनी सोशल मीडिया (फेसबुक) वर निवेदन जारी केले की, संसदेकडून घेतलेला हा निर्णय घटनाबाह्य (Unconstitutional) आहे, कारण त्यांनी आधीच संसद बरखास्त केली होती. त्यांनी लिहिले की- ह मतदान अवैध आहे आणि शून्य घोषित केला जाईल.
advertisement
त्यानंतरच्या अहवालानुसार राष्ट्रपती राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत. मात्र ते फ्रेंच सैन्याच्या मदतीने (Airlift) बाहेर काढले गेले का, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ती स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पण त्यांनी कोणताही थेट हस्तक्षेप नाकारला.
advertisement
आफ्रिकन युनियनचा इशारा
आफ्रिकन युनियनने (African Union) मादागास्करमधील या लष्करी कारवाईची तीव्र निंदा केली आहे. कोणत्याही असंवैधानिक सत्तांतराला मान्यता दिली जाणार नाही. तसेच युनियनने मादागास्करच्या सैनिकांना इशारा दिला की त्यांनी राजकीय हस्तक्षेप टाळावा.
कर्नल रांद्रियनिरिना, हंगामी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार- कर्नल मायकेल रांद्रियनिरिना यांनी आता देशाचे हंगामी राष्ट्रपती म्हणून कामकाज हाती घेतले आहे. त्यांच्यावर देशातील शांती राखणे आणि 60 दिवसांत निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजधानी अंतानानारिव्होमध्ये सेनेची मोठी तैनाती करण्यात आली आहे.
रांद्रियनिरिना यांच्या युनिटने सांगितले की- देशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आम्ही सत्ता ताब्यात घेतली आहे. मात्र विरोधी पक्ष आणि नागरी संघटनांनी या घटनेला “सैन्य बंड (Military Coup)” ठरवले असून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
अँद्री राजोएलिना: डीजे ते राष्ट्रपती असा वादग्रस्त प्रवास
राष्ट्रपती पदावरून हटवण्यात आलेले अँद्री राजोएलिना हे एकेकाळी डीजे आणि उद्योजक होते. त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत नाट्यमय आणि वादग्रस्त राहिला आहे.
-2007 मध्ये ते राजधानी अंतानानारिव्होचे महापौर बनले.
-2009 मध्ये वयाच्या फक्त 34व्या वर्षी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती मार्क रावालोमनाना यांना लष्करी मदतीने हटवून सत्ता हस्तगत केली आणि आफ्रिकेतील सर्वांत तरुण राष्ट्रपती बनले.
-2018 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकून सत्ता मिळवली.
-2023 मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र त्या निवडणुकीवर गोंधळाचा आरोप करत विरोधकांनी बहिष्कार घातला होता.
-गेल्या काही वर्षांत त्यांच्या कारभारावर भ्रष्टाचार, नातेसंबंधवाद आणि सत्तेचा गैरवापर याचे आरोप झाले. सेनेतील नाराजी आणि जनतेतील असंतोष अखेर त्यांच्या सत्तेच्या समाप्तीचे कारण ठरले.
सध्याची स्थिती
राजधानी अंतानानारिव्होमध्ये तणाव कायम आहे. रांद्रियनिरिना यांची CAPSAT युनिट आणि लष्करी दलांनी देशभरात सुरक्षेचा ताबा घेतला आहे. देशातील नागरी गट आणि विरोधक ही परिस्थिती लोकशाहीविरोधी सैन्य हस्तक्षेप असल्याचा आरोप करत आहेत. तर न्यायालय आणि सेना याचा अर्थ स्थैर्यासाठी आवश्यक पाऊल असल्याचे म्हणत आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
नेपाळनंतर मादागास्करमध्ये सत्तांतराचा भूकंप, राष्ट्रपतींची हकालपट्टी; राजधानी लष्कराच्या ताब्यात, संसद विसर्जित
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement