advertisement

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक, पंतप्रधान बनताच बालेन शाहांकडून कारवाई

Last Updated:

Nepal Former PM KP Sharma Oli Arrested: नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह
Nepal Former PM KP Sharma Oli Arrested: नेपाळच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना पोलिसांनी अटक केली आहे. नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण दक्षिण आशियातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या विरोधात तरुण पिढीने (Gen-Z) तीव्र आंदोलनं छेडली होती. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात तब्बल ७७ लोकांचा मृत्यू झाला होता. आंदोलकांनी संसद पेटवून दिली होती. या उग्र आंदोलनामुळे मंत्र्यांना हेलिकॉप्टरनं पळून जावं लागलं होतं. या प्रकरणात झालेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement

आयोगाचा अहवाल आणि अटकेची कारवाई

माजी विशेष न्यायालय न्यायाधीश गौरी बहादूर कार्की यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने या हिंसाचाराचा तपास केला होता. आयोगाने आपल्या अहवालात ओली, रमेश लेखक आणि तत्कालीन पोलीस प्रमुख चंद्र कुबेर खापुंग यांच्यावर राष्ट्रीय दंड संहितेच्या कलम १८१ आणि १८२ अंतर्गत खटला चालवण्याची शिफारस केली होती. या कलमांनुसार दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.
advertisement

बालेन शाह यांचा पहिला 'मास्टरस्ट्रोक'

शुक्रवारीच बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कार्की आयोगाचा अहवाल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अटकेपूर्वी शुक्रवारी उशिरापर्यंत गृहमंत्री सुदन गुरुंग आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांमध्ये खलबते झाली. यानंतर नेपाळच्या माजी पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांना अटक करण्यात आली. केपी शर्मा ओली यांचा कल नेहमीच चीनकडे राहिला आहे. त्यांच्या अटकेमुळे चीनच्या नेपाळमधील रणनीतीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
advertisement

राजकीय भविष्य अस्थिर?

ज्या युवकांनी जुन्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खेचले, त्यांच्या भावनांचा आदर करत बालेन शाह यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे नेपाळमध्ये आता प्रस्थापित राजकारण्यांचे दिवस संपून एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक, पंतप्रधान बनताच बालेन शाहांकडून कारवाई
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement