'गळे कापून टाकू', भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याचा इशारा, VIDEO VIRAL
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
VIRAL VIDEO: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर देखील आंदोलन केलं आहे. यावेळी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने आंदोलकांकडे पाहून 'सर तन से जुदा'चा इशारा दिला आहे.
लंडन: मंगळवारी २२ एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या घातल्याचं सांगण्यात येत आहे. हा हल्ला झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी परदेशात देखील याचे पडसाद उमटत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर देखील आंदोलन केलं आहे. विद्यार्थ्यांनी पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी पाकिस्तानी डिप्लोमॅटच्या कृत्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभं राहून भारतीय आंदोलकांकडे पाहून थेट 'सर तन से जुदा'चा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या गळ्यावरून अंगठा फिरवत, गळा कापू अशा प्रकारचा इशारा केला आहे. या कृत्यातून कर्नल तैमूर यांनी भारतीय आंदोलकांना डिवचण्यचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार आंदोलकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
advertisement
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तैमूर यांच्या हातात यावेळी भारतीय लष्करी अधिकारी अभिनंदन यांचा फोटो असणारं पोस्टरही पाहायला मिळत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
advertisement
लंदन में भारतीय लोग पाकिस्तानी दुतावास के बाहर पहलगाम हमले के खिलाफ प्रदर्शन कर रहे थे
तब कर्नल तैमूर राहत जो ब्रिटेन में पाकिस्तान का मिलिट्री अटैशे है उसने दूतावास की बालकनी पर आकर भारतीयों को अभिनंदन की तस्वीर लेकर उनका गला काटने का इशारा किया #PahalgamTerroristAttack pic.twitter.com/tY7f17cUQb
— Sachin Panwar (@ChowdharyPanwar) April 26, 2025
advertisement
VIDEO | Indian community stages protest outside the Pakistan High Commission in London against the Pahalgam terror attack that took 26 innocent lives.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/QDGnm7vPBl
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2025
advertisement
लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येनं भारतीय नागरिकांनी हातात निषेधाचे फलक आणि राष्ट्रध्वज घेत विरोधाचा सूर आळवला. अडचणीच्या आणि संघर्षाच्या या प्रसंगी देश म्हणून आम्ही सारे एकत्र आहोत असं ठणकावून सांगताना भारतानं पाकिस्तानची कोंडी केल्याची नारेबाजीसुद्धा या आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि या सर्व वातावरणातच पाकिस्तानी अधिकाऱ्याची ही कृती टीकेची धनी ठरली.
view commentsLocation :
Delhi
First Published :
April 26, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
'गळे कापून टाकू', भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याचा इशारा, VIDEO VIRAL


