Boeing Plane : विमान 26,000 फूट विमान खाली आलं, प्रवाशांना काळ दिसला, जगाच्या निरोपाची तयारी केली अन्...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Boeing Plane : एक मोठा विमान अपघात टळला. हवेत असलेले विमान अचानकपणे तब्बल 26,000 फूटांनी खाली आले. त्यानंतर प्रवाशांनी आपल्या अखेरच्या घटका मोजण्यास सुरुवात केली होती. परंतु पायलटने आपलं कसब पणाला लावत सुखरुप लँडिंग केले.
नवी दिल्ली: एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमान अपघाताच्या दु:खद आठवणी अनेकांच्या मनात अजूनही ताज्या असताना दुसरीकडे एक मोठा विमान अपघात टळला. हवेत असलेले विमान अचानकपणे तब्बल 26,000 फूटांनी खाली आले. त्यानंतर प्रवाशांनी आपल्या अखेरच्या घटका मोजण्यास सुरुवात केली होती. परंतु पायलटने आपलं कसब पणाला लावत सुखरुप लँडिंग केले. बिघाड झालेले विमानदेखील बोईंग ड्रिमलाइनर असल्याची माहिती मिळाली आहे.
जपान एअरलाइन्सच्या शांघायहून टोकियोला जाणाऱ्या फ्लाइट JL8696 मध्ये सोमवार (1 जुलै) रोजी एका भीषण घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं. या Boeing 737 विमानाने अचानक 26,000 फूट उंचीवरून अवघ्या 10 मिनिटांत खाली आले. विमान वेगाने अचानकपणे खाली आल्यानंतर विमानातील 191 प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
जपानच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता हे विमान शांघायहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अचानक कॅबिन प्रेशर कमी झाल्याचा अलार्म वाजला. प्रवाशांनी “एक मोठा आवाज (boom)” ऐकला आणि काही क्षणातच ऑक्सिजन मास्क खाली पडले. क्रू सदस्यांनी तातडीने प्रवाशांना मास्क लावण्यास सांगितलं. काहीजण तर रडायला लागले आणि निरोपाची चिठ्ठी लिहू लागले, अशी माहिती प्रवाशांनी स्थानिक मीडियाला दिली.
advertisement
Emergency Spring and Autumn Airlines 6.30 Japan Spring and Autumn 1J004, Boeing 737, Shanghai flew to Tokyo more than 10,000 metres above the city of free fall to 3,000 metres of fish
Before that, I heard a muffled boom, and the oxygen mask fell off within a few seconds. The… pic.twitter.com/FY56ZNvcEQ
— ght sunli (@GSunli45639) June 30, 2025
advertisement
एका प्रवाशाने सांगितलं, “माझं शरीर इथे आहे, पण आत्मा अजूनही त्या आकाशात अडकला आहे. पाय अजून थरथरत आहेत.” दुसऱ्या प्रवाशाने सांगितलं की, “त्या क्षणी वाटलं की आता काही क्षणांत सगळं संपेल... मी निरोपाची चिठ्ठी लिहायला सुरुवात केली.”
पायलटने प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तातडीने ओसाका येथील कांसाय आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
प्रवाशांना ओसाकामध्ये हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आणि Spring Japan एअरलाइन्सकडून प्रत्येकी 15,000 येन (सुमारे 9000 रुपये / 100 डॉलर) नुकसानभरपाईही देण्यात आली. मात्र, काही प्रवाशांनी कंपनीच्या संथ प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा Boeing विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण काही आठवड्यांपूर्वीच अहमदाबादमध्ये Dreamliner विमानाचा अपघात झाला होता.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
July 02, 2025 3:02 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Boeing Plane : विमान 26,000 फूट विमान खाली आलं, प्रवाशांना काळ दिसला, जगाच्या निरोपाची तयारी केली अन्...


