जमीन हादरली सायरन वाजला, उंच लाटांनी घात केला, रशिया-जपानमध्ये भूकंप अन् त्सुनामी, पाहा VIDEO

Last Updated:

रशियाच्या कामचटका येथे 8.7 तीव्रतेचा भूकंप झाला, त्सुनामीचा अलर्ट जारी. जपान, हवाई, अलास्का उच्च सतर्कतेवर. जीवितहानीची माहिती नाही, परंतु मोठं नुकसान झालं आहे.

News18
News18
काहीतरी भयंकर घडतंय, याची प्रचीत आज पहाटेपासून येत आहे. समुद्रातल्या उथळ भागात आज भूकंपाचे जोरदार झटके बसले. रशिया जपानमधील अनेक शहरांमध्ये तीव्र झटके बसले आहेत. अनेक घरांचं नुकसान झालं. समुद्र किनाऱ्यालगच्या भागांमध्ये पाणी शिरलं आहे. त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्सुनामीच्या पहिल्याच लाटेनं शहरात पाणी शिरलं आहे.
रशियातील कामचटका येथे तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.७ इतकी मोजण्यात आली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंप समुद्राखाली झाला, त्यानंतर त्सुनामीचा धोकाही आहे. अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
advertisement
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र घरांचं आणि दुकानांचं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपान हवामान संस्थेने म्हटले आहे की सुमारे १ मीटर उंचीच्या लाटा जपानच्या किनारी भागात पोहोचू शकतात.
advertisement
advertisement
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. सरकारने आपत्कालीन बैठकही बोलावली आहे, ज्यामध्ये मदत आणि बचाव कार्यांवर चर्चा करण्यात आली. यासाठी देशात तयारी देखील सुरू झाली आहे.
advertisement
रशियामध्ये 8.8 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इमारतींना मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. कुरिल आइसलँड भागात समुद्राच्या उंच लाटा आल्यानं मोठं नुकसान झालं. कामचटका प्रायद्वीप परिसरात 8.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली होती.
advertisement
जपानच्या NHK टेलिव्हिजननुसार, भूकंप जपानच्या चार मोठ्या बेटांपैकी सर्वात उत्तरेकडील होक्काइडोपासून सुमारे २५० किलोमीटर (१६० मैल) अंतरावर झाला आणि तो हलकासा जाणवला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की भूकंप १९.३ किलोमीटर (१२ मैल) खोलीवर झाला. कामचटकावर झालेल्या परिणामाबद्दल रशियाकडून तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
जमीन हादरली सायरन वाजला, उंच लाटांनी घात केला, रशिया-जपानमध्ये भूकंप अन् त्सुनामी, पाहा VIDEO
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement