युक्रेनच्या राजधानीत हाहाकार, मेट्रो ट्रेन उडवली, पुतिनचा घातक गेम; ड्रोन हल्ल्यांनी थैमान घातले, मृत्यू आणि आगीचा आक्रोश

Last Updated:

Russia Missile Strike On Ukraine: रशियाने ‘ऑपरेशन स्पायडरवेब’चा सूड घेत युक्रेनवर विध्वंसक हल्ला चढवला आहे. कीवसह अनेक शहरांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांनी थैमान घातले असून, मृत्यू आणि आगीचा आक्रोश चारही दिशांना पसरला आहे.

News18
News18
कीव: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने पुन्हा एकदा भीषण वळण घेतले आहे. रशियाने ‘ऑपरेशन स्पायडरवेब’चा प्रतिशोध घेतल्याचा दावा करत कीवसह युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले चढवले. शुक्रवारी रात्री झालेल्या या जोरदार हल्ल्यांमुळे राजधानी कीवमध्ये रात्रीभर स्फोटांचे आवाज घुमत होते.
या हल्ल्यांत तीन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह किमान चार जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कीवमधील मेट्रो सेवा पूर्णतः ठप्प झाली असून अनेक निवासी इमारतींना आग लागली आहे. कीवच्या सोलोमिंस्की जिल्ह्यातील एक निवासी इमारत पूर्णतः उद्ध्वस्त झाली तर डार्नित्स्की आणि पश्चिमी जिल्ह्यातही आगीचे प्रकार घडले. स्थानिक प्रशासनानुसार मेट्रो स्टेशनदरम्यान चाललेली एक ट्रेन देखील हल्ल्याची शिकार झाली.
advertisement
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सहकारी देशांना आवाहन करत सांगितले की, जर जग निर्णायक पावले उचलणार नसेल तर तेही या युद्धाचे भागीदार ठरतील. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यांना युक्रेनच्या दहशतवादी कृतींना दिलेला प्रतिसाद असे म्हटले आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ अंतर्गत रशियाच्या 41 बॉम्बवर्षक विमानांचे नुकसान केल्याचा दावा केला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाल्याचे बोलले जात आहे.
इतर शहरांमध्येही स्थिती गंभीर आहे. टेरनोपिल येथे 10 लोक जखमी झाले असून त्यात पाच आपत्कालीन सेवा कर्मचारी आहेत. पोल्टावा आणि खमेलनित्सकीमध्ये इमारती आणि कॅफेंवर हल्ले झाले. ल्वीवमध्ये युक्रेनच्या एअर डिफेन्सने तीन रशियन क्षेपणास्त्रांना पाडले.
advertisement
युक्रेनच्या मानवाधिकार आयोगाने रशियाला 'दहशतवादी राष्ट्र' म्हणून जाहीर करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मराठी बातम्या/विदेश/
युक्रेनच्या राजधानीत हाहाकार, मेट्रो ट्रेन उडवली, पुतिनचा घातक गेम; ड्रोन हल्ल्यांनी थैमान घातले, मृत्यू आणि आगीचा आक्रोश
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement