डायबेटिज, हार्ट पेशंट आणि क्रोनिक आजार असलेल्यांना अमेरिकेत नो एन्ट्री! काय आहे ट्रम्पचा नवा नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इमीग्रेशन नियम कठोर केले असून, आता अमेरिकेच्या व्हिसासाठी उत्तम आरोग्य आणि उपचार खर्चाची क्षमता आवश्यक ठरणार आहे.
अमेरिकेत स्थायिक होण्याचे किंवा आपल्या मुला मुलींजवळ कायमचे जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इमीग्रेशन नियमांमध्ये मोठे बदल केला आहे. इमीग्रेशनचे नियम कठोर केले आहेत. आता अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी केवळ कागदपत्रेच नव्हे, तर अर्जदाराचे आरोग्यही उत्तम असणे अनिवार्य असणार आहे.
आरोग्य समस्या असल्यास व्हिसा नामंजूर
ट्रम्प प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच एक सरकारी आदेश जारी केला असून, त्यानुसार व्हिसा अर्ज करणाऱ्या व्यक्तीला जर ओबेसिटी किंवा डायबिटीज यांसारख्या आरोग्य समस्या असतील, तर त्याला अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दूतावासांना आणि वाणिज्य कॉन्सुलट्स पाठवलेल्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे की, आजारी व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश दिल्यास ते पब्लिक बर्डन बनू शकतात.
advertisement
आरोग्य तपासणीची व्याप्ती वाढवली
आजवर व्हिसा प्रक्रियेत स्थलांतरितांच्या आरोग्याचे मूल्यांकन केले जात होते. यात प्रामुख्याने क्षयरोग आणि मानसिक आरोग्याची माहिती घेतली जायची. मात्र, या नवीन नियमांमुळे आरोग्य तपासणीची मर्यादा खूप वाढली आहे. आता व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदाराची आरोग्य स्थिती पाहून, त्याचा अर्ज नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार मिळाला आहे. एका अहवालानुसार, आजारी लोकांना व्हिसा दिल्यास त्यांच्या उपचारांवर अमेरिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील, असा प्रशासनाचा विचार आहे.
advertisement
जाडपणा, कर्करोग, हृदयविकार यावर लक्ष
दूतावासांना पाठवलेल्या या पत्रात कोणत्या वैद्यकीय स्थितींचा विशेष विचार करायचा, हे स्पष्ट केले आहे. यात फक्त संसर्गजन्य आजारच नव्हे, तर जाडपणा, हृदयविकार, श्वासोच्छ्वास संबंधीचे रोग, कर्करोग, मधुमेह, मेटाबॉलिक आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार तसेच मानसिक रोगांचाही समावेश आहे. त्यामुळे आता भारतीयांसह इतर देशांतील स्थलांतरितांना अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना 'फिट' असणे आवश्यक झाले आहे.
advertisement
उपचाराचा खर्च करण्याची क्षमता तपासणार
view commentsया नियमांमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, व्हिसा अधिकारी आता अर्जदाराला गंभीर आजार झाल्यास तो स्वतःच्या उपचाराचा खर्च उचलण्यास सक्षम आहे की नाही, याचे मूल्यांकन करतील. या नियमांमुळे कायमस्वरूपी निवासाच्या (पर्मनंट रेसिडेन्स) अर्जांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिका प्रवेशाची प्रक्रिया अधिक जटिल आणि आव्हानात्मक बनली असून, अर्जदारांना आता आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 9:16 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
डायबेटिज, हार्ट पेशंट आणि क्रोनिक आजार असलेल्यांना अमेरिकेत नो एन्ट्री! काय आहे ट्रम्पचा नवा नियम


