US Strike In Syria: अमेरिकेचा सीरियावर मोठा हल्ला, दहशतवाद्यांच्या 70 ठिकाणांवर टाकले बॉम्ब
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
US Forces Launched Operation Hawkeye Strike: सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने मोठी कारवाई केली आहे.
US Forces Launched Operation Hawkeye Strike: सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी, अमेरिकन सैन्याने सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) च्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या आठवड्यात अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केले होते की या हल्ल्याचा बदला घेतला जाईल. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पुष्टी केली की, सीरियामध्ये 'ऑपरेशन हॉकआय' राबवलं जात आहे. १३ डिसेंबर रोजी मध्य सीरियातील पालमीरा भागात अमेरिका आणि सहयोगी दलांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. हेगसेथ यांनी सांगितलं की या कारवाईत थेट ISIS दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं.
अमेरिका सीरियामध्ये युद्धाला सुरुवात?
हेगसेथ यांनी स्पष्टपणं सांगितलं की ही नवीन युद्धाची सुरुवात नाही, तर अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला आहे. जगात कुठेही अमेरिकन लोकांना लक्ष्य केलं गेलं तर अमेरिका हल्लेखोरांचा शोध घेईल आणि त्यांचा खात्मा करेल. अमेरिकन सैन्यानं त्यांच्या शत्रूंना मारलं आहे आणि हे ऑपरेशन सुरूच राहील. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, मध्य सीरियामध्ये हा हवाई हल्ला करण्यात आला आणि त्यात इसिसशी संबंधित डझनभर ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, ही कारवाई अत्यंत अचूक आणि व्यापक होती.
advertisement
अमेरिका का संतापली आहे?
गेल्या शनिवारी, मध्य सीरियातील पालमिरा शहरात एक मोठा हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक स्थानिक अनुवादक मृत पावला होता. हल्लेखोरानं अमेरिकन आणि सीरियन सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य केलं. प्रत्युत्तरात हल्लेखोरही मारला गेला. या हल्ल्यात इतर तीन अमेरिकन सैनिकही जखमी झाले. अमेरिकन सैन्याच्या मते, हल्लेखोर सीरियन सुरक्षा दलांचा सदस्य होते. तसेच त्यांचा संबंध इसिसशी असल्याचा संशय आहे. या घटनेमुळे अमेरिकन सैन्यांनी हा प्रतिहल्ला केला.
advertisement
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या ऑपरेशनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, सीरियामध्ये इसिसनं अमेरिकन सैनिकांच्या क्रूर हत्येनंतर आता प्रत्युत्तर कारवाई सुरू झाली आहे. शहीद अमेरिकन सैनिकांना लष्करी सन्मानानं घरी आणण्यात आलं. त्यांच्या सन्मानार्थ हा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला जात आहे. अमेरिका सीरियामध्ये इसिसच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले करत आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Dec 20, 2025 7:02 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
US Strike In Syria: अमेरिकेचा सीरियावर मोठा हल्ला, दहशतवाद्यांच्या 70 ठिकाणांवर टाकले बॉम्ब










