Donald Trump : हे वागणं बरं नव्हं... ट्रम्पने रंग दाखवले, भारतावर मोठा टॅरिफ बॉम्ब टाकला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्रूथ वरून याची घोषणा केली आहे.
मुंबई : अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्रूथ वरून याची घोषणा केली आहे. भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबतही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'आमचा भारतासोबत व्यापारामध्ये बराच घाटा आहे. भारत आमचा मित्र आहे, पण त्यांनी कायमच आमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावला आहे. त्यांचे नॉन-टॅरिफ नियम खूपच कठोर आणि अप्रिय आहेत. जग रशियाने युक्रेनसोबत युद्ध थांबवावं, अशी अपेक्षा करत असताना भारत आजही रशियाकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि उर्जा विकत घेतं', असं ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
advertisement
'भारताला आता 25 टक्के टॅरिफ द्यावं लागणार आहे. तसंच वर दिलेल्या कारणांमुळे त्यांना अतिरिक्त दंड द्यावा लागणार आहे, हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे', असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
ट्रम्प यांनी आधीच दिले होते संकेत
याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप आलं नाही, तर भारताला 25 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) द्यावं लागेल, असा इशारा दिला होता. मंगळवारी पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना करार झाला नाही तर भारताला जास्त टॅरिफ द्यावा लागेल का? असा सवाल विचारला होता. त्यावर ट्रम्प यांनी, हो मला असंच वाटतंय, असं उत्तर दिलं होतं.
advertisement
कोणत्या देशावर किती टॅरिफ?
22 जुलै 2025 ला अमेरिका आणि फिलिपाईन्स यांच्यात द्विराष्ट्रीय व्यापार करार झाला, ज्यात फिलिपाईन्सच्या निर्यातीवर 19 टक्के टॅरिफ लावण्यात आला, जो आधी 20 टक्के होता. याबदल्यात फिलिपाईन्सने अमेरिकन ऑटोमोबाईल आणि औद्योगिक उत्पादनांवरचा टॅरिफ हटवला.
अमेरिकेने इंडोनेशियावर 19 टक्के टॅरिफ लावला आहे, जो आधी 32 टक्के होता. तर अमेरिकेने जपानवर 15 टक्के टॅरिफ लावला आहे, जो आधी 25 टक्के होता. ऑटोमोबाईल टॅरिफ 15 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. युकेसोबत अमेरिकेचा 2024 साली ट्रेड सरप्लस होता, त्यामुळे युकेवर सगळ्यात कमी 10 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे, पण युकेमधील ऑटोमोबाईल आणि स्टील निर्यातीवर 25 टक्के टॅरिफ आहे.
advertisement
मे 2025 साली अमेरिकेने चीनसोबत व्यापार करार केला, ज्यानंतर अमेरिकन टॅरिफ 145 टक्क्यांहून कमी करून 30 टक्के करण्यात आला आहे आणि चीनी टॅरिफ 125 टक्क्यांहून कमी करून 10 टक्के करण्यात आला. कॅनडा आणि मॅक्सिको या देशांवर सुरूवातीला 25 टक्के टॅरिफची घोषणा करण्यात आली होती, पण नंतर झालेल्या करारामुळे टॅरिफ एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. आता या देशांसोबत अमेरिकेची चर्चा सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump : हे वागणं बरं नव्हं... ट्रम्पने रंग दाखवले, भारतावर मोठा टॅरिफ बॉम्ब टाकला!


