अमेरिकेची रशियाला धमकी, ट्रम्प म्हणाले- 50 दिवस देतो, थांबला नाही तर विनाश अटळ; जगभरात खळबळ

Last Updated:

Russia Ukraine War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोठा इशारा दिला आहे. त्यांनी 50 दिवसांत युद्ध थांबवण्याचे आदेश दिले असून, तसे न झाल्यास रशियावर 100% टॅरिफ लावण्याचा इशारा केला आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रशिया आणि युक्रेन यांच्यात 50 दिवसांच्या आत युद्धविरामाचा करार न झाल्यास रशियावर 100% आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा इशारा दिला. ट्रम्प यांनी हे वक्तव्य व्हाईट हाऊसमध्ये नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान केले.
मी व्यापाराचा वापर अनेक गोष्टींसाठी करतो, असं सांगत ट्रम्प म्हणाले- पण युद्ध थांबवण्यासाठी तो खूप प्रभावी आहे.
दरम्यान, डच पंतप्रधान मार्क रुट यांनी युक्रेनला NATO-US करारांतर्गत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पुरवण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
ट्रम्प यांचा पुतिनवर संताप
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतरही रशिया-युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी कोणताही यशस्वी तोडगा न निघाल्याने ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी ट्रम्प यांनी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिनवर “एक सांगतो आणि दुसरं करतो” असा आरोप केला.
advertisement
मला वाटलं होतं की पुतिन जे बोलतात तेच खरंच करतात. ते खूप गोड बोलतो आणि मग रात्री लोकांवर बॉम्ब फेकतात. आम्हाला असं चालत नाही, असं ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. त्यांनी युक्रेनला Patriot एअर डिफेन्स मिसाईल्स पाठवण्याचीही घोषणा केली.
ट्रम्प यांच्या भूमिकेतील बदल
पूर्वी पुतिनबाबत सौम्य भूमिका घेणारे ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात त्यांच्यावर थेट टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पुतिनवर अमेरिका आणि NATOच्या शांतता प्रयत्नांना कायमचा विरोध केल्याचा आरोप केला. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फेब्रुवारीत झालेल्या वादानंतर ट्रम्प यांचा त्यांच्याबाबतचा सूर सौम्य झाला आहे. वाढत्या रशियन हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी Patriot प्रणाली पाठवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
ही लष्करी उपकरणं अब्जावधी डॉलर्सची आहेत आणि ती अमेरिका विकणार असून NATOकडून थेट रणभूमीवर पाठवली जातील, असं ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं.
ट्रम्पचा दूत कीवमध्ये
ट्रम्प यांच्या विशेष दूत कीथ केलॉग यांनी सोमवारी कीवमध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी याला फलदायी बैठक म्हणून संबोधलं आणि सांगितलं की त्यांनी युक्रेनचे हवाई संरक्षण, संयुक्त संरक्षण उत्पादन व युरोपच्या सहकार्याने शस्त्रसाठ्याबाबत चर्चा केली.
advertisement
रशियाने नवे गाव ताब्यात घेतले
सोमवारी रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमध्ये दोन गावं ताब्यात घेतल्याचा दावा केला. यापैकी एक गाव डोनेट्स्कमध्ये आणि दुसरं झापोरीझ्झिया प्रदेशात आहे. पूर्व खार्किव आणि सुमी प्रदेशात रशियन हल्ल्यांत तीन नागरिकांचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेची रशियाला धमकी, ट्रम्प म्हणाले- 50 दिवस देतो, थांबला नाही तर विनाश अटळ; जगभरात खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement