मित्राच्या मदतीला धावले Donald Trump, अमेरिकेचा ब्राझिलवर 'टॅरिफ बॉम्ब', कारण मात्र भलतंच!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
US imposs 50 Percent tariff on Brazil : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ब्राझीलमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 % कर लावण्याची घोषणा केली आहे.
Donald Trump US Brazil Tariff : अमेरिकेने टॅरिफबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता जगभरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. आर्थिक धोरण सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांना घाम फोडलाय. अशातच काल सात देशांवर टॅरिफची घोषणा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा बॉम्ब फोडलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ब्राझीलमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 % कर लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ब्राझीलच नाही तर जगभरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
ब्राझीलवर 50 टक्के टॅरिफ का लावला?
अमेरिकेने ब्राझीलवर 50% आयात शुल्क (tariff) लादण्यामागे अनेक कारणे आहेत, जी प्रामुख्याने आर्थिक नसून राजकीय असल्याचे दिसते. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावरील सध्या सुरू असलेल्या खटल्याला (ज्यात 2022 च्या निवडणुका उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप आहे) ते 'विच हंट' आणि 'आंतरराष्ट्रीय अपमान' मानतात. बोल्सोनारो, जे ट्रम्प यांचे राजकीय मित्र आहेत, त्यांच्यावरील कायदेशीर प्रक्रिया राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे.
advertisement
मुक्त निवडणुकांवर कपटी हल्ले
अमेरिकेचा आरोप आहे की, ब्राझीलने 'मुक्त निवडणुकांवर कपटी हल्ले' केले आहेत आणि 'अमेरिकन लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे' उल्लंघन केले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 15 वर्षांत वस्तू आणि सेवांच्या व्यापारात अमेरिकेचा ब्राझीलसोबत व्यापार चांगला (trade surplus) राहिला आहे. तरी देखील आपल्या मित्रासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं पाऊल उचललं आहे.
advertisement
2019 ते 2022 दरम्यान ब्राझीलवर राज्य करणारे बोल्सोनारो यांच्यावर जानेवारी 2023 मध्ये लुला निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या हजारो समर्थकांनी राजधानीतील सरकारी इमारतींवर हल्ला करून सत्तापालट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे. त्यावेळी बोल्सोनारो अमेरिकेत होते आणि त्यांनी दंगलखोरांशी कोणताही संबंध किंवा कटात कोणताही सहभाग असल्याचे नाकारले आहे.
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा निषेध
advertisement
दरम्यान, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी या शुल्काचा तीव्र निषेध केला आहे, त्यांना ब्राझीलच्या सार्वभौमत्वावर आणि न्यायिक स्वातंत्र्यावर हल्ला असं म्हटलं आहे. ब्राझील एक सार्वभौम राष्ट्र असून ते कोणाकडूनही दबाव स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सध्या अमेरिका आणि ब्राझिल यांच्यात कर युद्धाची चर्चा सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
मित्राच्या मदतीला धावले Donald Trump, अमेरिकेचा ब्राझिलवर 'टॅरिफ बॉम्ब', कारण मात्र भलतंच!


