चीनमधील सत्तांतरच्या चर्चेने एकच खळबळ, शी जिनपिंग सत्ता सोडणार; मोठी उलथापालथीकडे जगाचे लक्ष

Last Updated:

Xi Jinping: शी जिनपिंग यांनी पक्षातील नेत्यांना अधिकार वाटप सुरू केले आहे. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची समाप्ती 2027 मध्ये होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, ते निवृत्तीची तयारी करत आहेत.

News18
News18
बीजिंग: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना आजवर आयुष्यभरासाठी सत्तेवर राहणारा नेता म्हणून पाहिले गेले. मात्र अलीकडील घडामोडींमुळे आता चर्चेला वेग आला आहे की शी जिनपिंग आपल्या निवृत्तीची पायाभरणी करत आहेत. त्यांनी पहिल्यांदाच पक्षातील विविध नेत्यांकडे सत्ता आणि अधिकार वाटप करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सुमारे 12 वर्षांच्या कारकिर्दीत असे पहिल्यांदाच होत आहे.
पक्षाच्या नियमांमध्ये बदल 
सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (CPC) 24 सदस्यीय पॉलिटब्युरोने 30 जून रोजी झालेल्या बैठकीत नव्या नियमांची पुनर्रचना केली. हे नियम पक्षाच्या निर्णायक, सल्लागार आणि समन्वयक निकायांसाठी लागू करण्यात आले आहेत. शी यांच्या नेतृत्वाखाली या नियमांनी पार्टीच्या अंतर्गत संस्थांना अधिक अधिकार देण्याची दिशा ठरवली आहे.
सीपीसी काँग्रेस ठरणार निर्णायक?
शी जिनपिंग यांचा तिसरा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार आहे. त्याचवेळी सीपीसीची पुढील पाच वर्षांची काँग्रेस होणार आहे. या पार्श्वभूमीवर शी यांनी सत्तेच्या हस्तांतरणाची सुरुवात केल्याची चर्चा आहे. पक्षाच्या अंतर्गत गटांना निर्णय प्रक्रिया, धोरण आखणी आणि देखरेखीसंबंधी अधिक जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.
advertisement
 तज्ज्ञांनी दिले संकेत
परदेशात वास्तव्यास असलेल्या अनेक चिनी असंतुष्ट गटांमध्येही या बदलांमुळे सत्तांतराच्या शक्यतेवर चर्चा रंगली आहे. काही विश्लेषकांनी यामागे शी जिनपिंग यांची निवृत्तीपूर्व तयारी असल्याचे सांगितले आहे. हाँगकाँगस्थित South China Morning Postने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने सांगितले की, सत्तांतराच्या कालखंडात अशा प्रकारचे नियम अपरिहार्य असतात.
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक विक्टर शिह यांनी सांगितले की, शी हे आता रोजच्या प्रशासकीय तपशीलांपासून दूर राहत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलिस यंत्रणेची गरज भासते.
advertisement
ब्रिक्स परिषदेत गैरहजेरी, आर्थिक आव्हाने
शी जिनपिंग यंदा रिओ डि जानेरियोमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेला गैरहजर राहिले. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच त्यांनी अशा महत्त्वाच्या बैठकीत भाग घेतला नाही. यावरूनही त्यांच्या भूमिकांमध्ये बदल होत असल्याचे संकेत मिळतात. दुसरीकडे, अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध, 440 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर परिणाम करणारे टैरिफ, घरबांधणी क्षेत्राचा ऱ्हास आणि कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट गंभीर बनले आहे.
advertisement
भ्रष्टाचारविरोधी मोहीम
2012 मध्ये शी जिनपिंग सीपीसीचे महासचिव झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणून सत्ता आपल्याकडे केंद्रीत केली. त्यांनी चीनमधील सर्वात मोठी भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवली. यात लाखो अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि अनेक जनरल पदावरून हटवले गेले.
अध्यक्षपदासाठी नियम बदल
शी यांनी स्वतःसाठी आयुष्यभर सत्ता राखण्यासाठी संविधानात बदल केला. राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ दोन पंचवार्षिकांवर मर्यादित असण्याचा नियम रद्द करण्यात आला. त्यामुळे 2022 मध्ये ते पुन्हा महासचिव आणि 2023 मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले.
advertisement
2027 हे वर्ष ठरवणार राजकीय भविष्य
2027 मध्ये त्यांच्या कार्यकाळाची समाप्ती होणार असून, त्याचवेळी सीपीसीची पुढील काँग्रेस होईल. तज्ज्ञांच्या मते, याच वेळी शी जिनपिंग सत्ता हस्तांतर करतील किंवा सत्ता सामायिक करण्याचा मार्ग स्वीकारतील. हे त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचे महत्त्वाचे वळण ठरण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
चीनमधील सत्तांतरच्या चर्चेने एकच खळबळ, शी जिनपिंग सत्ता सोडणार; मोठी उलथापालथीकडे जगाचे लक्ष
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement