एक-दोन नाही तब्बल 465 पक्वानं! सासऱ्याने केला असा पाहुणचार, भारावला जावई, ढसाढसा रडला
- Published by:Priya Lad
Last Updated:
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात मकर संक्रांतीनिमित्त जावयाचा सासरी कसा पाहुणचार झाला ते दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून सगळे थक्क झाले आहेत.
नवी दिल्ली : जावई घरी येणार म्हटलं की मुलीच्या घरी अक्षरश: घाई होते. जावयासाठी पंचपक्वानाची तयारी सुरू होते. जावयाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पदार्थ बनवले जातात. पण लाडाचा जावई म्हणून फार फार तर किती पदार्थ तयार होतील, 5, 10, 15, 20, 50, 100... आकडा वाचूनच घाम फुटला असेल. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. एका जावयासाठी त्याच्या सासरच्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 465 पदार्थ बनवले. असा पाहुणचार पाहून जावई भारावला आणि त्याला रडू कोसळलं.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात जावयाचा सासरी कसा पाहुणचार झाला ते दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओत तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांनी एक मोठं टेबल भरलेलं दिसेल. केळ्याच्या पानांवर हे सगळे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. माहितीनुसार एकूण 465 पदार्थ आहेत.
advertisement
पुद्दुचेरीतील येनममधील सत्या भास्कर यांचं हे कुटुंब आहे. त्यांची मुलगी हरिण्या जिचं लग्न आंध्र प्रदेशच्या विजयवाडामधील साकेतशी झालं आहे. गेल्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतरची त्यांची पहिली संक्रांत. त्यानिमित्ताने हरिण्याच्या कुटुंबाने मुलगी आणि जावयाला घरी बोलावलं. त्यांच्यासाठी 465 पक्वानं केली.
465 Dishes for new son-in-law for #Sankranthi
Indian families are known to host new sons-in-law with highest regards. It is almost customary to prepare a #LavishMeal for son-in-law's visit to make him feel special.
Harinya of #Yanam got married to Saket of Vijayawada last year.… pic.twitter.com/JBGHMxvBqL
— Surya Reddy (@jsuryareddy) January 14, 2025
advertisement
सासऱ्यांनी जावयाला फुलांचा हार घालून त्याचं स्वागत केलं. इतकं पक्वान आणि असं स्वागत पाहून जावईही भारावला. सासऱ्यांनी पुष्पहार घालताच जावयाच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. तो ढसाढसा रडू लागला. @jsuryareddy ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
Location :
Puducherry (Pondicherry)
First Published :
January 15, 2025 4:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
एक-दोन नाही तब्बल 465 पक्वानं! सासऱ्याने केला असा पाहुणचार, भारावला जावई, ढसाढसा रडला