जगातील सर्वात श्रीमंत राजा, पण जगला फकिरासारखा! देशाला दिलं 5000kg सोनं, वाचा भन्नाट राजाची अद्भूत कहाणी
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मीर उस्मान अली खान हे हैदराबादचे सातवे निजाम जगातील सर्वात श्रीमंत राजा होते. त्यांची एकूण संपत्ती 20 लाख कोटी होती. ते 1300 कोटींचा डायमंड फक्त पेपरवेटसाठी वापरत. टिनच्या ताटात...
हैदराबादचे सातवे निझाम मीर उस्मान अली खान यांचं आयुष्य पाहिलं तर ते एक वेगळंच जग वाटतं. जगातील सगळ्यात श्रीमंत सम्राट असूनही ते साधेपणात जगले. ज्यांच्या टेबलावर हिरा पेपरवेट म्हणून वापराल जायचा. पण ते स्वतः टीनच्या ताटात जेवत असत. भारतातील राजघराण्यांचं आलिशान जीवन, त्यांच्या महाल, महागड्या गाड्या, अमूल्य खजिना याबद्दल अनेक कथा आपण ऐकतो. पण या सगळ्यांमध्येही मीर उस्मान अली खान यांची कथा वेगळीच आहे.
जगातले सगळ्यात श्रीमंत - पण त्यांना काहीच मोह नव्हता
त्यांची एकूण संपत्ती जवळपास ₹20,35,000 कोटी (अमेरिकन डॉलरमध्ये अंदाजे $236 अब्ज) होती. त्यांच्याकडे 185 कॅरेटचा 'जेकब डायमंड' नावाचा हिरा होता, ज्याची किंमत सध्या अंदाजे ₹1350 कोटी आहे. पण तोही त्यांनी पेपरवेट म्हणून वापरला होता. त्यांच्याकडे टनांनी सोने आणि किलोच्या किलो हिरे होते. पन्नासहून अधिक रोल्स-रॉयस गाड्या, महाल, दागदागिने, आणि विशाल जमिनी असूनही ते साधेपणात राहायचे. ही अमाप संपत्ती आणि अनोख्या वागणुकीमुळे मीर उस्मान अली खान हे जगातील सर्वात वेगळ्या सम्राटांपैकी एक मानले जातात. त्यांनी कधी वैभवाचा गर्व केला नाही. उलट ते दररोज ऐश्वर्य आणि साधेपणाच्या टोकावर जगायचे.
advertisement
फलकनुमा पॅलेस - शाही वैभवाचं प्रतीक
1893 मध्ये बांधलेला फलकनुमा पॅलेस 32 एकरांवर पसरलेला आहे. यात 220 खोल्या आहेत आणि 80 फूट लांब जेवणाचं टेबल आहे, ज्यावर एकाच वेळी 101 लोक जेवू शकतात. या महालाच्या सौंदर्यामुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे त्याचा उल्लेख ‘टाईम’ मासिकाच्या मुखपृष्ठावरही झाला होता.
एकीकडे अपार संपत्ती, तर दुसरीकडे अतिशय साधेपणा
advertisement
- त्यांनी 32 वर्षांपासून फक्त एकच जुनी टोपी वापरली होती.
- त्यांचे कपडेही जुनेच असत आणि बरेच वेळा इस्त्रीशिवाय ते घालायचे.
- सोने-चांदीची भांडी असूनही ते जेवण टीनच्या ताटात करत.
- पाहुण्यांनी अर्धवट ओढलेली सिगरेट सुद्धा ते उचलून ओढायचे.
- माझ्याकडे गाड्या आहेत, पण जुनी गाडी चालवतो
त्यांच्याकडे अनेक रोल्स-रॉयस गाड्या होत्या, पण ते जुनी, मोडकळीला आलेली गाडीच वापरत. जर शहरात कुठे एखादी सुंदर गाडी दिसली तर ते सरळ त्या गाडीच्या मालकाला ती गाडी भेट म्हणून मागायचे. आणि बहुतेक लोक त्यांचा आग्रह मोडू शकत नसत. त्यांना दागिने, महाल, हिरे यांच्यात रस नव्हता. ते केवळ नवीन प्रकारच्या गाड्यांमध्ये रस घेत असत. पण वापरत मात्र जुनी गाडीच.
advertisement
देशासाठी दिलं 5 टन सोने
1965 साली भारत-चीन युद्धाच्या वेळी त्यांनी भारत सरकारला 5 टन (5000 किलो) सोने दान दिलं. ही आजवरची सगळ्यात मोठी देणगी मानली जाते. त्यांच्या देशप्रेमाचा आणि जबाबदारीचा हा मोठा पुरावा होता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही मीर उस्मान अली खान यांनी अतिशय साधं आयुष्य जगणं पसंत केलं. ते त्यांच्या वागणुकीतून एक गोष्ट शिकवून गेले, संपत्ती म्हणजे फक्त एक साधन आहे. माणसाला मोठं करतो तो त्याचा आदर आणि नम्रता, पैसा नव्हे.
advertisement
हे ही वाचा : तिसरं महायुद्ध झालंच, तर जगातील कोणते देश राहण्यासाठी सुरक्षित आहेत? 90% लोकांना माहीत नाही याचं उत्तर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/Viral/
जगातील सर्वात श्रीमंत राजा, पण जगला फकिरासारखा! देशाला दिलं 5000kg सोनं, वाचा भन्नाट राजाची अद्भूत कहाणी


