आई, अजब तुझी माया! 84 वर्षांच्या आईमुळे 50 वर्षांच्या मुलीला मिळाला पुनर्जन्म; मातेच्या प्रेमापुढे वय हरलं!

Last Updated:

भरतपूरमधील 84 वर्षीय बुद्धोदेवी यांनी आपल्या 50 वर्षीय मुलगी गुड्डी देवीवर आरोग्याचं संकट आलं असताना अनोखं धाडस दाखवलं आणि आपल्या मुलीचा वाचवला जीव...

Mother donates kidney
Mother donates kidney
जगात आईचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. ती केवळ आपल्याला जन्मच देत नाही, तर प्रसंगी आपल्या मुलांसाठी स्वतःच्या प्राणांचीही बाजी लावते. याचेच एक अनोखे उदाहरण जयपूरजवळील भरतपूरमध्ये पाहायला मिळालं आहे. जिथे 84 वर्षांच्या बुद्धो देवी यांनी आपल्या 50 वर्षांच्या गुड्डी देवी या लेकीला नवीन जीवन देण्यासाठी आपली किडनी दान केली. ही कथा केवळ मातृप्रेमाची खोलीच नाही, तर वैद्यकीय जगातही एक नवा अध्याय जोडणारी ठरली आहे.
गुड्डी देवी गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर किडनी विकाराने (CKD) त्रस्त होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या हळूहळू काम करणे बंद करत होत्या. दर तिसऱ्या दिवशी डायलिसिससाठी रुग्णालयात जाणे, शारीरिक अशक्तपणा आणि मानसिक ताण यामुळे त्यांचे जीवन त्रस्त झाले होते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की, किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) लवकर न केल्यास त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. कुटुंबात कोणताही योग्य दाता उपलब्ध नव्हता. नातेवाईक आणि मित्रांपैकी कोणीही किडनी दान करण्यासाठी पुढे आले नाही. गुड्डीच्या आशा हळूहळू मावळत होत्या. तेव्हा एका मातेने आपल्या लेकीला जीवनदान दिले.
advertisement
आईने किडनी दान करण्याचा घेतला निर्णय
84 वर्षांच्या बुद्धो देवी यांनी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान करण्याचे ठरवले. या वयात जिथे लोक स्वतःच्या आरोग्याची काळजी करतात, तिथे बुद्धो देवी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुलीसाठी हे मोठे पाऊल उचलले. डॉक्टरांना सुरुवातीला संकोच वाटला, कारण इतक्या जास्त वयात किडनी दान करणे धोकादायक ठरू शकते. पण बुद्धो देवींच्या धैर्याने आणि लेकीवरील प्रेमाने सर्वांनाच प्रेरणा दिली.
advertisement
प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती
जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात सखोल तपासणीनंतर डॉक्टरांना आढळले की, बुद्धो देवींचे आरोग्य किडनी दान करण्यासाठी योग्य आहे. त्यांची किडनी गुड्डीच्या शरीरासाठी पूर्णपणे जुळणारी होती. अनेक वैद्यकीय चाचण्या, समुपदेशन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झाली. शस्त्रक्रियेच्या दिवशी बुद्धो देवींनी आपल्या मुलीला मिठी मारत सांगितले, "तू माझा जीव आहेस; माझ्या हातात असतं तर तुला कसलाही त्रास होऊ दिला नसता." हा क्षण केवळ कुटुंबासाठीच नाही, तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठीही भावनिक होता. डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेनंतर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
advertisement
शस्त्रक्रिया यशस्वी झाली. गुड्डीची तब्येत हळूहळू सुधारू लागली आणि बुद्धो देवीही निरोगी राहिल्या. डॉक्टरांच्या मते, बुद्धो देवींचे आरोग्य आणि धैर्य त्यांच्या वयानुसार विलक्षण होते. या घटनेने वैद्यकीय जगात एक नवे उदाहरण प्रस्थापित केले, कारण इतक्या जास्त वयात किडनी दानाचे असे प्रकार खूप दुर्मिळ आहेत. गुड्डीने आपल्या आईच्या त्यागाचे शब्दांत वर्णन केले आणि म्हणाली, "माझ्या आईने मला दुसऱ्यांदा जन्म दिला आहे. तिचा हा त्याग मी कधीच विसरू शकत नाही." घरातील इतर सदस्यही बुद्धो देवींच्या धैर्याची आणि प्रेमाची प्रशंसा करताना थकत नाहीत. ही कथा केवळ त्यांच्या गावातच नाही, तर संपूर्ण जयपूर आणि आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय बनली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
आई, अजब तुझी माया! 84 वर्षांच्या आईमुळे 50 वर्षांच्या मुलीला मिळाला पुनर्जन्म; मातेच्या प्रेमापुढे वय हरलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement