वडील गेले, मग कुत्राही गेला, दोघांच्या मृत्यूनंतर महिलेच्या डोक्यात अचानक वेदना, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीनच सरकली

Last Updated:

Headache Causes : 2021 वर्षे तिला स्वतःला सावरण्यात गेला. अखेर 2022 साली तिने सोलो ट्रिपला जायचं ठरवलं. या प्रवासाचं वर्णन तिने टर्निंग पॉइंट म्हणून केलं आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून तिला पुन्हा नव्याने जगायला बळ मिळालं. पण घरी परतल्यानंतर फक्त दोन आठवड्यांनीच परिस्थिती बदलली.

News18
News18
नवी दिल्ली : बऱ्याचदा असं होतं संकटं किंवा दु:ख आले की लागोपाठ येतात. असंच एका 57 वर्षांच्या महिलेसोबत घडलं. तिने आधी आपल्या वडिलांना गमावला, त्यांचं निधन झालं. त्यानंतर तिच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला. या धक्क्यातून ती सावरते न सावरते तोच तिचा नवरा तिला सोडून गेला आणि त्यानंतर अचानक तिच्यासोबत आणखी भयानक प्रकार घडलं.
advertisement
57 वर्षांची सॅम अॅडम्स ससेक्समधील ब्राइटनजवळ राहते. 2020 हे वर्ष तिच्यासाठी भयानक होतं. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर अचानक तिचा कुत्राही गेला. दोघांच्या मृत्यूचा शोक करत असतानाच तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं. तिचा नवरा तिच्यापासून दूर गेला. 2021 वर्षे तिला स्वतःला सावरण्यात गेला. अखेर 2022 साली तिने सोलो ट्रिपला जायचं ठरवलं. या प्रवासाचं वर्णन तिने टर्निंग पॉइंट म्हणून केलं आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून तिला पुन्हा नव्याने जगायला बळ मिळालं. पण घरी परतल्यानंतर फक्त दोन आठवड्यांनीच परिस्थिती बदलली.
advertisement
ती म्हणाली, माझ्यात ऊर्जा नव्हती, माझं डोकं दुखत होतं. माझं अ‍ॅपल वॉच माझ्या हृदयाचे ठोके खूप कमी असल्याचं वारंवार सांगत होतं. सुरुवातीला मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही शेवटी ब्लड प्रेशर तपासलं. काही तासांतच तिच्या डॉक्टरांनी तिला छाती, खांदा किंवा जबडा दुखत असल्यास आपात्कालीन नंबरवर फोन करायला सांगितलं.
advertisement
दुसऱ्या दिवशी ईसीजीमध्ये तिच्या हृदयाचे अतिरिक्त ठोके पडत असल्याचं दिसून आले, ज्याला कार्डियाक एक्टोपी म्हणतात. हे सहसा हानीकारक नसतो, पण कधीकधी ते धोकादायक बनू शकतं. इतर समस्या वगळण्यासाठी डॉक्टरांनी सीटी स्कॅनसह पुढील चाचण्या करण्याचे आदेश दिले. त्या स्कॅनमध्ये सॅमने कधीही अपेक्षा केली नसलेली गोष्ट आढळली, ते म्हणजे ब्रेन ट्यूमर.
advertisement
सॅम म्हणते, हे मला हादरवणारं होतं. मला धक्का बसला, मी सोफ्यावर बसले आणि माझ्या बहिणीला फोन केला. अचानक मला माझ्या स्वतःच्या मृत्युचा सामना करावा लागला. मी जागे झाले नाही तर झोपायलाही घाबरत होते."
डॉक्टरांनी सांगितलं की ट्यूमर कदाचित सौम्य आहे पण तो ज्या ठिकाणी आहे, ते पाहता बरा होऊ शकत नाही. धोका कमी करण्यासाठी दररोज अ‍ॅस्पिरिनसह त्याचं आयुष्यभर निरीक्षण करावं लागेल. दरम्यान, तिच्या हृदयावर उपचार आवश्यक होते. ऑगस्ट 2002 मध्ये तिच्या हृदयावरील ताण कमी करण्यासाठी तिने अ‍ॅब्लेशन प्रक्रिया केली. बेशुद्धीशिवाय केलेली ही प्रक्रिया भयानक होती, असं सॅम सांगते. आज सॅम तिच्या ट्यूमरला टिमी म्हणून संबोधते.
advertisement
द सनच्या वृत्तानुसार सॅम म्हणते, माझा तोल गेला तरी मला भीती वाटते. मी थकवा, वजन वाढणं आणि कमी ऊर्जा यांसारख्या समस्यांशी देखील झुंजते, परंतु सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करते. 
advertisement
मागे वळून पाहताना, सॅमचा असा विश्वास आहे की वर्षानुवर्षे अप्रक्रिया केलेल्या ताणामुळे तिच्या आरोग्याच्या बिघाडात भूमिका होती. 2020 मध्ये माझ्या शरीरावर त्याचा काय परिणाम होत आहे हे मला कळत नसताना मी खूप आघात सहन केले.
view comments
मराठी बातम्या/Viral/
वडील गेले, मग कुत्राही गेला, दोघांच्या मृत्यूनंतर महिलेच्या डोक्यात अचानक वेदना, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीनच सरकली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement