Husband-wife Shocking News : बायको धावत का गेली? म्हणून नवराही धावला; खोलीचा दरवाजा उडला आणि पायाखालची जमीनच सरकली
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Husband-wife Shocking News : बायकोला अचानक काय झालं हे पाहण्यासाठी तिचा नवराही धावला आणि जेव्हा त्याने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा हे दृश्य दिसलं ते पाहून धक्का बसला.
मुंबई : कुंभस्नानाहून परतलेल्या एका महिलेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. खरंतर कुंभमेळ्यातून आल्यानंतर तिच्या घरचे सगळे गाडीतून सामान उतरवत होते. पण तेवढ्यात ही महिला धावत आपल्या खोलीत गेली. तिला अचानक काय झालं हे पाहण्यासाठी तिचा नवराही धावला आणि जेव्हा त्याने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा हे दृश्य दिसलं ते पाहून धक्का बसला.
खरंतर अचानक अशक्तपणा जाणवल्याने ती बेशुद्ध झाली. कुटुंबीय तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी ही महिला आपल्या पतीसह आणि कुटुंबातील सदस्यांसोबत कुंभस्नानासाठी गेली होती. स्नान उरकल्यानंतर सर्व जण घरी परतले. घरी पोहोचल्यावर गाडीतलं सामान उतरवण्याचं काम सुरू होतं. त्या गडबडीत ती वरच्या खोलीत गेली.
advertisement
थोड्या वेळाने तिचा पती तिला पाहायला गेला. खोलीत पोहोचताच त्याला ती बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. घाबरून त्याने कुटुंबीयांना आवाज दिला. तिला उलट्या होत होत्या आणि तिची तब्येत झपाट्याने बिघडत होती. कुटुंबीय तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले.
रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. पण दुर्दैवाने, उपचारादरम्यान तिचं निधन झालं. कुटुंबीयांना या धक्क्याने कोसळल्यासारखं झालं. त्यांनी तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी शवागारात नेलं.
advertisement
तपासासाठी पोलीस रुग्णालयात पोहोचले. कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले. तपासादरम्यान समोर आलं की, ही महिला आपल्या पतीसह, सासऱ्यांसह आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कुंभस्नानासाठी गेली होती. परत आल्यावरच ती अचानक बेशुद्ध पडली.
महिलेच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात त्यांनी सांगितलं की, तिने चुकून विषारी पदार्थ खाल्ला असावा. त्यामुळे पोलीस या प्रकरणाकडे अपघाती मृत्यू म्हणून पाहत आहेत. ही संपूर्ण घटना चरखी दादरी शहरातील एका महिलेसोबत घडली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 20, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Husband-wife Shocking News : बायको धावत का गेली? म्हणून नवराही धावला; खोलीचा दरवाजा उडला आणि पायाखालची जमीनच सरकली