बराच वेळ बंद होता प्लेनच्या टॉयलेटचा दरवाजा, एअर हॉस्टेसने उघडला, आतलं दृश्य सहनच करू शकली नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane Toilet : एअर हॉस्टेसने बराच वेळ वाट पाहिली शेवटी तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला पण तिला आत जे दृश्य दिसलं ते कल्पनेपलीकडे होतं.
नवी दिल्ली : एक काळ असा होता जेव्हा हवेत उडणं हे स्वप्न होतं. पण आज ते खूप सामान्य झालं आहे आणि विमानाने प्रवास केल्याने आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. यामुळे केवळ वेळ वाचत नाही तर कमी थकव्यासह लांबचा प्रवास करणं देखील शक्य होतं. पण विमानात काही वेळा असं काही घडतं जे कल्पनेपलीकडलं असतं. असंच काहीसं घडलं ते अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात.
अमेरिकन एअरलाइन्समध्ये ड्युटीवर असलेल्या एअर हॉस्टेसला विमानाचं टॉयलेट बंद असल्याचं लक्षात आलं. बराच वेळ झाला टॉयलेटचा दरवाजा बंदच होता. कुणीच बाहेर येत नव्हतं. एअर हॉस्टेसने बराच वेळ वाट पाहिली शेवटी तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला पण तिला आत जे दृश्य दिसलं ते कल्पनेपलीकडे होतं. आत असं दृश्य दिसलं ज्याची तिला अपेक्षा नव्हती. ते दृश्य पाहून ती हादरलीच.
advertisement
तिच्यासमोर एक व्यक्ती बसला होता जो सिगारेट ओढत होता आणि धुराचे रिंग सोडत होता. विमानात स्मोकिंगला बंदी आहे. त्यामुळे एअर हॉस्टेस त्याला बडबडू लागली. त्या माणसाने तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि स्वतःला सेलिब्रिटी पिकलबॉल कोच म्हणू लागला.
advertisement
या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. पीटर नगुएन नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वॉशरूमच्या दरवाजावर एअर हॉस्टेस भांडताना दिसते आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये तो माणूस असं म्हणत असल्याचं ऐकू येतं की, फ्लाइट अटेंडंटने त्याच्यावर हात उचलला. तिथं उभ्या असलेल्या दुसऱ्या एअर हॉस्टेसने सांगितलं की तो आत धूम्रपान करत होता, ज्याला विमानात परवानगी नाही. यावर संतप्त झालेल्या माणसाने सांगितलं की तो स्वतः एक वकील आहे आणि सोशल मीडियावर त्याचे 25 हजार फॉलोअर्स आहेत जे ही घटना पाहत आहेत. पण त्याने या घटनेबाबत पोलिसांना कळवलं की नाही हे सांगण्यात आलेलं नाही.
advertisement
या घटनेनंतर अमेरिकन एअरलाइन्सने सॅन फ्रान्सिस्को इंटरनॅशनल एअरपोर्टवर प्रवाशाला खाली उतरवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं. या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेक लोकांनी निगुएनचं वर्तन चुकीचं आणि बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे. यानंतर त्या माणसाचं वर्तन बदललं आणि त्याने लिहिले की तो तणावात आहे. त्याला काय करावं हे समजत नाही. इतकंच नाही तर तो स्वतःला ऑटिस्टिक म्हणवू लागला.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 31, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बराच वेळ बंद होता प्लेनच्या टॉयलेटचा दरवाजा, एअर हॉस्टेसने उघडला, आतलं दृश्य सहनच करू शकली नाही


