झेब्राच्या शरीरावर काळे-पांढरे पट्टे का असतात? त्याची वैशिष्ट्यं कोणती? 99% लोकांना माहिती नसेल याचं उत्तर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
झेब्रा हा काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा घोडासदृश प्राणी आहे. त्यांच्या पट्ट्यांचे कार्य, धोक्याचा सामना, सामाजिक वर्तन आणि झोपण्याची पद्धत अनोखी असते.
Amazing facts about zebras: झेब्रा म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर काळे-पांढरे पट्टे असलेला घोड्यासारखा दिसणारा प्राणी येतो. इंग्रजी शिकवताना Z या अक्षरासाठी झेब्राचा उल्लेख केला जातो, त्यामुळे तो सर्वांनाच माहिती असतो. मात्र, झेब्रा या प्राण्याबद्दल बऱ्याच कमी लोकांना सविस्तर माहिती असते.
झेब्राच्या पट्ट्यांचे रहस्य
शास्त्रज्ञ गेल्या 150 वर्षांपासून झेब्राच्या पट्ट्यांबद्दल संशोधन करत आहेत. अनेकांचे असे मत आहे की हे पट्टे शिकाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी असतात. काहींनी असेही सांगितले की, हे पट्टे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. मात्र, एका संशोधनात असे आढळले आहे की, झेब्राच्या शरीरावरील पट्ट्यांमुळे डास आणि इतर किडे चावत नाहीत.
कायम सावध राहणारा प्राणी
advertisement
झेब्रा कायम सतर्क असतो. तो ज्या भागात राहतो, तिथे सिंह, वाघ, बिबटे आणि तरस यांसारखे शिकारी सहज सापडतात. त्यामुळे झेब्रा सतत संभाव्य धोक्याची जाणीव ठेवतात. जेव्हा एखादा शिकारी प्राणी दिसतो, तेव्हा झेब्रा एक विशेष आवाज काढून आपल्या सहकाऱ्यांना सतर्क करतात. विशेष म्हणजे, रात्री झेब्रांच्या गटातील एक सदस्य जागा राहतो आणि पहारा देतो.
advertisement
शिकाऱ्यांपासून बचाव करण्याच्या युक्त्या
- झेब्रा धोक्याच्या वेळी पळून जात नाहीत, तर लढतात.
- ते किक मारतात, धक्का देतात आणि चावण्याचाही प्रयत्न करतात.
- गटातील सदस्यांना वाचवण्यासाठी ते वर्तुळात उभे राहतात आणि गटातील पिल्लांना सुरक्षित ठेवतात.
- ते अत्यंत वेगवान असतात आणि धावण्यात कुशल असतात.
प्रत्येक झेब्राचे पट्टे वेगळे असतात
जसे प्रत्येक माणसाचे फिंगरप्रिंट वेगळे असतात, तसेच प्रत्येक झेब्राचे पट्टेही वेगळे असतात. दूरून पाहताना हे पट्टे सारखे वाटतात, पण प्रत्यक्षात ते भिन्न असतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, झेब्रांना त्यांच्या गटातील सदस्यांना ओळखण्यासाठी या पट्ट्यांचा उपयोग होतो.
advertisement
झेब्रा - एक सामाजिक प्राणी
झेब्रा हा सामाजिक प्राणी असून तो गटाने राहतो. ते शिकाऱ्यांपासून एकमेकांचे संरक्षण करतात. झेब्रा सहा वेगवेगळे आवाज काढू शकतात. विशेषतः, शिकाऱ्यांचा धोका असल्यास ते गंभीर गुरगुरण्याचा आवाज करतात. याशिवाय, ते शारीरिक हालचालींद्वारे भावना व्यक्त करतात.
झेब्रा झोप कसा घेतो?
खूप कमी लोकांना माहिती आहे की, झेब्रा उभ्याने झोपू शकतो. तो घोड्याप्रमाणेच आपल्या गुडघ्यांना लॉक करून झोपतो, त्यामुळे झोपेत पडत नाही. झेब्रांची तुलना नेहमी घोड्यांशी केली जाते. ते घोड्यांपेक्षा लहान असतात, पण अत्यंत वेगाने पळू शकतात. झेब्रा हा केवळ सुंदर दिसणारा प्राणी नाही, तर तो शिस्तबद्ध, सतर्क आणि धोक्याचा सामना करण्यास तयार असणारा प्राणी आहे. त्यामुळे निसर्गातील या अद्भुत प्राण्याबद्दल जाणून घेणे निश्चितच रोचक आहे.
advertisement
हे ही वाचा : World's Best Handwriting : खरंच मोत्यासारखं अक्षर! व्हायरल होतंय जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, पण आहे कुणाचं?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2025 3:17 PM IST
मराठी बातम्या/Viral/
झेब्राच्या शरीरावर काळे-पांढरे पट्टे का असतात? त्याची वैशिष्ट्यं कोणती? 99% लोकांना माहिती नसेल याचं उत्तर











