डोळे उघडे ठेवून झोपतात हे प्राणी, जवळ जाण्याची चुक आजिबात करु नका, नाहीतर करुन घ्याल स्वत:चं नुकसान
- Published by:Devika Shinde
Last Updated:
निसर्गात अशा काही विलक्षण जीवांची निर्मिती झाली आहे, ज्यांचा झोपेचा पॅटर्न माणसांच्या कल्पनेपलीकडचा आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या अद्भुत प्राण्यांविषयी, जे झोपेतही जागे दिसतात.
मुंबई : आपण सर्वांनी हे नेहमी पाहिलंय की माणूस असो किंवा प्राणी तो झोपताना डोळे मिटतो. पण जर कोणी सांगितलं की काही प्राणी असे आहेत जे डोळे उघडे ठेवून झोपतात, तर नक्कीच आश्चर्य वाटेल, नाही का? निसर्गात अशा काही विलक्षण जीवांची निर्मिती झाली आहे, ज्यांचा झोपेचा पॅटर्न माणसांच्या कल्पनेपलीकडचा आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या अद्भुत प्राण्यांविषयी, जे झोपेतही जागे दिसतात.
जिराफ : उभं राहून, डोळे उघडे ठेवून झोपणारा
जिराफ हा त्याच्या उंच काठीमुळे जगभर ओळखला जातो. पण त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो बहुतेक वेळा उभ्याच झोपतो आणि झोपताना त्याचे डोळे अर्धवट उघडे असतात. यामागचं कारण म्हणजे सतत सावध राहणं. जिराफला नेहमीच शिकारी प्राण्यांचा धोका असतो, त्यामुळे तो डोळे उघडे ठेवूनच आपली झोप पूर्ण करतो, जेणेकरून एखादा धोका जवळ आल्यास तो लगेच पळू शकेल.
advertisement
मगर : डोळे उघडे ठेवून सावधान झोपणारा शिकारी
पाण्यातील सर्वात धोकादायक शिकारी मानली जाणारी मगरही डोळे पूर्णपणे बंद न करता झोपते. ती नदीकाठी किंवा तलावाच्या काठावर निवांत पडून विश्रांती घेत असते, पण तिचे डोळे सतत अर्धवट उघडे असतात. त्यामुळे ती एकाच वेळी आरामही करते आणि आसपासच्या शिकार किंवा धोक्यांवर लक्षही ठेवते.
advertisement
साप : डोळे न मिटणारा प्राणी
सापाच्या बाबतीत तर गोष्ट वेगळी आहे. सापाला पापण्या नसतात. त्यांच्या डोळ्यावर एक पारदर्शक पडदा (स्केल) असतो, जो डोळ्यांचं संरक्षण करतो. त्यामुळे साप झोपलेला असला तरी त्याचे डोळे उघडे असल्यासारखे दिसतात. प्रत्यक्षात तो झोपेत असतो, पण बाहेरून पाहणाऱ्याला तो जागा असल्यासारखा वाटतो.
डॉल्फिन : अर्धी झोप, अर्धं जागं मन
डॉल्फिनचा झोपण्याचा प्रकार सगळ्यात वेगळा आहे. पाण्यात राहणाऱ्या या बुद्धिमान प्राण्याचा झोपेचा पॅटर्न स्लो-वेव्ह स्लीप म्हणून ओळखला जातो. झोपताना तिच्या मेंदूचा एक भाग विश्रांती घेतो, तर दुसरा भाग जागा राहतो. त्यामुळे डॉल्फिनची एक डोळा झोपेतही उघडा राहतो. हे तिला पाण्यातील शिकाऱ्यांपासून सुरक्षित राहण्यास मदत करतं.
advertisement
निसर्गातील हे उदाहरणं आपल्याला शिकवतात की प्रत्येक जीव आपल्यापरीने जगण्यासाठी अद्भुत रीतीने जुळवून घेतो. डोळे उघडे ठेवून झोपणं हे त्यांच्या जगण्याचं एक हत्यारच आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/Viral/
डोळे उघडे ठेवून झोपतात हे प्राणी, जवळ जाण्याची चुक आजिबात करु नका, नाहीतर करुन घ्याल स्वत:चं नुकसान


