बड्या कंपनीच्या CEO चं HR सोबत अफेअर, कॉन्सर्टमध्ये पोलखोल, रोमान्स करताना कॅमेऱ्यात कैद

Last Updated:

CEO HR Affair Exposed During Coldplay Concert : कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तशी चर्चा होतच असते. पण यावेळी हा कॉन्सर्ट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या कॉन्सर्टमध्ये एका बड्या कंपनीच्या सीईओचं त्याच्या एचआरसोबत असलेलं अफेअर समोर आलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : असे काही लोक आहेत ज्यांचे विवाहबाह्य संबंध असतात. बड्या बड्या कंपनीचे अधिकारीही याला चुकले नाहीत. अशाच एका बड्या कंपनीचा सीईओ ज्याचं लग्न झालं आहे, त्याचं अफेअर समोर आलं आहे. सीईओचे एचआरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड झालं आहे. कॉन्सर्टमध्ये त्यांच्या अफेअरची पोलखोल झाली. रोमान्स करताना ते कॅमेऱ्यात कैद झाले.
प्रसिद्ध रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तशी चर्चा होतच असते. पण यावेळी हा कॉन्सर्ट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या कॉन्सर्टमध्ये एका बड्या कंपनीच्या सीईओचं त्याच्या एचआरसोबत असलेलं अफेअर समोर आलं आहे. त्याचं नाव आहे अँडी बायर्न जे अ‍ॅस्ट्रोनॉर्मचा सीईओ आहे. जो त्यांच्या कंपनीची एचआर क्रिस्टिन कॅबोटसह बोस्टनमध्ये सुरू असलेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टला पोहोचले.
advertisement
कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांवर लाइटचा फोकस मारला जात होता. या फोकसमध्ये हे दोघंही आले. तेव्हा ते एकमेकांच्या मिठीत होते. त्यांच्या रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला. आपण सगळ्यांना दिसत आहोत, आपल्याला सगळे पाहत आहेत, हे लक्षात येताच दोघांनीही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. हातांनी आपले चेहरे झाकून घेतले.
advertisement
advertisement
एका युझरने म्हटलं दोघंही विवाहित आहेत आणि त्यांचे प्रेमसंबंध आहेत, म्हणून ते उघडकीस आले आणि सर्वत्र पसरले आहे. त्याच वेळी, काही युझर्सनी यावर मजेदार इमोजी शेअर केले आहेत.
यावेळी कोल्डप्लेमधील क्रिस मार्टिन मोठ्याने ओरडला. अरे या दोघांना पाहा, अरे काय?. त्याच क्षणी त्यांनी आपले चेहरे लपवले. तेव्हा मार्टिनने त्यांची खिल्ली उडवली, "एकतर त्यांचे प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत.", असं तो म्हणाले. ज्यामुळे लोक हसू लागले.
मराठी बातम्या/Viral/
बड्या कंपनीच्या CEO चं HR सोबत अफेअर, कॉन्सर्टमध्ये पोलखोल, रोमान्स करताना कॅमेऱ्यात कैद
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement