Baba Vanga Predictions: डायनासोरप्रमाणेच माणूसही पृथ्वीवरून गायब होणार? बाबा वेंगांनी वर्षही सांगितलंय
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Baba Vanga 2024 Predictions : बाबा वेंगा यांचं ऑगस्ट 1996 मध्ये निधन झालं. मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगांची अनेक भाकितं आजवर खरे ठरले आहेत.
नवी दिल्ली : बाबा वेंगा हे त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभरात ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी सांगितलेल्या काही भविष्यवाणी खऱ्या देखील झाल्या आहेत. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता, परंतु वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या डोळ्यात वादळामुळे माती गेल्याने त्यांना कायमचे आंधळेपण आले. परंतु असं म्हणतात त्यांची दृष्टी गेल्यापासून त्यांना भविष्य दिसायला लागले होते.
बाबा वेंगा यांचं ऑगस्ट 1996 मध्ये निधन झालं. मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगांची अनेक भाकितं (Baba Venga Predictions) आजवर खरे ठरले आहेत.
कधी होणार माणसाचा शेवट -
5079 मध्ये जगाचा अंत होईल हे बाबा वेंगा यांचं सर्वात प्रसिद्ध भाकीत आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वी, त्यांनी 5079 वर्षांपर्यंतची भविष्यवाणी केली होती. त्यांनी दावा केला होता की 5079 पर्यंत मानव डायनासोरप्रमाणे पृथ्वीवरून अदृश्य होईल. बाबा वेंगांच्या मते हे जग 5079 मध्ये संपेल.
advertisement
2024 सालासाठीची भविष्यवाणी -
बाबा वेंगा यांच्या मते, 2024 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची हत्या होऊ शकते. या कटात इतर कोणी नसून त्यांच्याच देशातील लोकांचा सहभाग असू शकतो. 2024 मध्ये युरोपमध्ये अनेक दहशतवादी हल्ले होऊ शकतात, असा इशारा बाबा वेंगा यांनी दिला होता. बाबा वेंगा यांच्या मते, जगातील सर्वात मोठा देश 2024 मध्ये जैविक शस्त्रांची चाचणी घेऊ शकतो. बाबा वेंगाचे हे भाकीत खरोखरच धोकादायक आहे.
advertisement
बाबा वेंगाचे पुढील भाकीत आर्थिक संकटाशी संबंधित आहे. त्यांच्या मते, 2024 मध्ये संपूर्ण जग मोठ्या आर्थिक संकटातून जाऊ शकतं. बाबा वेंगा यांच्या मते, जागतिक आर्थिक शक्तीतील बदल, भू-राजकीय तणाव आणि कर्जाची वाढती पातळी ही त्याची प्रमुख कारणे असतील. सध्या जगातील मोठे आणि बलाढ्य देशही आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. हे देश आर्थिकदृष्ट्या मोठ्या आव्हानांना तोंड देत आहेत.
advertisement
बाबा वेंगा यांनी यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगबाबतही इशारा दिला आहे. त्यांच्या मते, 2024 मध्ये संपूर्ण जगाला हवामानाशी संबंधित गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. बाबांच्या मते यावर्षी अनेक नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. एका अभ्यासानुसार, 40 वर्षांपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत यावर्षी उष्णतेच्या लाटेत सर्वाधिक तापमान वाढले आहे. जागतिक हवामान संघटनेने 2024 हे विक्रमी उष्ण वर्ष म्हणून नोंदले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2024 12:58 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Baba Vanga Predictions: डायनासोरप्रमाणेच माणूसही पृथ्वीवरून गायब होणार? बाबा वेंगांनी वर्षही सांगितलंय