Video : 'मेरे नैना सावन...' रस्त्यावर भिक मागणाऱ्या आजोबांनी गायलं गाणं, आवाज ऐकाल तर अंगावर काटा आल्याशिवाय रहाणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
व्हिडिओमध्ये एक बाबा दिसत आहेत, ज्यांनी एक कुर्ता घातला आहे आणि तो अगदीच मळलेला दिसत आहे. त्यांच्या हातात एक लाठी आहे आणि ते गाणं गाताना दिसत आहेत
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकतं, माणूस श्रीमंत असो वा गरिब, फक्त लोकांना आवडले की तो ट्रेंडमध्ये येतो आणि लाखों लोकांपर्यंत पोहोचतो. अशाच एका व्हायरल क्षणाने लोकांचे मन जिंकले आहे, ज्यामध्ये एक म्हातारे आजोबा आपल्या मधुर आवाजात 1976 च्या राजेश खन्ना आणि हेमा मालिनीच्या फिल्म 'महबूबा' मधील फेमस गाणं 'मेरे नैना सावन भादो' गात आहे.
व्हिडिओमध्ये एक बाबा दिसत आहेत, ज्यांनी एक कुर्ता घातला आहे आणि तो अगदीच मळलेला दिसत आहे. त्यांच्या हातात एक लाठी आहे आणि ते गाणं गाताना दिसत आहेत आणि त्याच्या हातात काही नाणी देखील आहेत. पण त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका, त्यांचा आवाज एखाद्या मोठ्या सिंगरला ही लाजवेल असा आहे, जो ऐकून सगळेच बोलतायत 'वन्स मोर...'
advertisement
सोशल मीडियावर लोक या आवाजाचे कौतुक करत आहेत. काहींनी म्हटले की, “या आवाजात गोडवा आणि वेदना दोन्ही दिसत आहेत, आणि या आजोबांचा एक एल्बम नक्की असावा!”
advertisement
व्हिडिओ पोस्ट करताना त्याच्यासोबत लिहिले होते – "सपोर्ट करो दोस्तों बाबा को आगे तक ले जाऊंगा" या व्हिडिओला आता लाखो लोकांनी पाहिला आहे. काही सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रियाही मनाला भिडणाऱ्या आहेत, त्यात एकानं म्हटलं की, "या आवाजावर लाखो डॉलर्सही कमी आहेत." दुसऱ्यानं म्हटलं, "दादाजींच्या आवाजात काय मिठास आहे, काय वेदना आहे." "सर्वांनी दादाजींना कौतुक केलं, पण तरी काही व्हायला हवं, शक्य असेल तर त्यांना मदत करा."
advertisement
सोशल मीडियावर लोकांचा प्रतिसाद आणि प्रेम इतकं मोठं असतं की, कुणी गरीब असो वा श्रीमंत, फक्त त्याच्या कलागुणाला पसंती मिळाली की तो व्हायरल होतो आणि हे आजोबा याचं उत्तम उदाहरण आहे. त्याचा आवाज लाखों लोकांच्या मनाला भिडला आणि तो आता सोशल मीडियाचा नवीन ट्रेंड बनला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 8:26 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : 'मेरे नैना सावन...' रस्त्यावर भिक मागणाऱ्या आजोबांनी गायलं गाणं, आवाज ऐकाल तर अंगावर काटा आल्याशिवाय रहाणार नाही