यारी लय भन्नाट हाय! मित्रमैत्रिणींसोबत राहिल्याने आजारही दूर राहतात

Last Updated:

Friednship benefits : मित्रांबरोबर फिरणं, वेळ घालवणं हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. ज्यांना चांगले मित्र असतात, त्यांना अनेक गंभीर आजारांचा धोका कमी असतो, असं एका संशोधनामधून दिसून आलं आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : मित्रांमुळे आयुष्य सुखकर बनतं. आयुष्यात मित्रांमुळे आनंदाचे क्षण भरभरून जगता येतात. कितीही दुःख असेल आणि मित्र सोबत असतील, तर हिंमत मिळते. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात. मित्रांबरोबर फिरल्याने फक्त आनंदच मिळत नाही, तर आरोग्यही सुधारतं. मित्रांबरोबर फिरणं, वेळ घालवणं हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. ज्यांना चांगले मित्र असतात, त्यांना अनेक गंभीर आजारांचा धोका कमी असतो, असं एका संशोधनामधून दिसून आलं आहे. मैत्री ही बाब शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मैत्रीचे अनेक फायदे आहेत. चांगले मित्र असतील, तर त्यांच्यामुळे चांगल्या सवयी आत्मसात केल्या जातात.
अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या (एपीए) एका रिपोर्टनुसार, मित्रांसोबत चांगली नाती मानसिक ताण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. जेव्हा आपण आपल्या मित्रांसोबत असतो तेव्हा आपलं शरीर एंडॉर्फिन हॉर्मोन रिलीज करतं. हे फील-गुड हॉर्मोन असतं. हे हॉर्मोन रिलीज झाल्यावर आपल्याला मानसिक शांती मिळते आणि ताण कमी होतो. यामुळेच कितीही मोठी अडचण असेल आणि मित्रांची साथ मिळाली की बरं वाटतं. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मित्रांसोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे.
advertisement
मित्रांसोबत राहिल्याने हृदय आणि मेंदू या दोन्हींमध्ये सुधारणा होते. ज्यांना चांगले मित्र असतात, त्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिसीजचा धोका कमी असतो, असं काही संशोधनांतून दिसून आलं आहे. मित्रांसोबत वेळ घालवल्याने शारीरिक कृती वाढतात. मित्रांसोबत चालल्याने, गेम खेळल्याने आणि व्यायाम केल्याने आरोग्याला चांगले फायदे मिळतात. यामुळे क्रियाशील राहण्यास मदत होते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने निरोगी राहता येतं. अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
advertisement
मित्रांसोबत वेळ घालवल्याने जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होतो. मित्रांमुळे हेल्दी सवयी स्वीकारल्या जातात. मित्रांसोबत हेल्दी डाएट, नियमित एक्सरसाइज या गोष्टींचा आपल्या रूटीनमध्ये समावेश केला जातो. चांगल्या मित्रांकडून आपल्याला चांगलं बनायची प्रेरणा मिळते. मित्रांसोबत वेळ घालवणं हे आनंदी आणि समाधानकारक आयुष्यासाठी खूप चांगलं आहे. ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो, असं या संशोधनातून दिसून आलं आहे.
मराठी बातम्या/Viral/
यारी लय भन्नाट हाय! मित्रमैत्रिणींसोबत राहिल्याने आजारही दूर राहतात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement