advertisement

Propose Video : बॉयफ्रेंडनं गर्लफेंडला केलं प्रपोज, मात्र तिनं लगावली थोबाडीत; नेमकं काय झालं?

Last Updated:

बऱ्याचदा लोक प्रेमात असले तरी एक्सप्रेस करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. यासाठी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. लोक या आठवड्यात आपलं प्रेम व्यक्त करतात.

 बॉयफ्रेंडनं गर्लफेंडला केलं प्रपोज, मात्र तिनं लगावली थोबाडीत
बॉयफ्रेंडनं गर्लफेंडला केलं प्रपोज, मात्र तिनं लगावली थोबाडीत
नवी दिल्ली : प्रेमात पडणं हा खूप सुंदर क्षण असल्याचं मानलं जातं. त्यामुळे लोक प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर खूप जीव लावतात, त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला लागतात. बऱ्याचदा लोक प्रेमात असले तरी एक्सप्रेस करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. यासाठी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. लोक या आठवड्यात आपलं प्रेम व्यक्त करतात. असाच प्रपोज करतानाचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भर लोकांमध्ये प्रपोज करतो. मात्र गर्लफेंडची त्यावर जी रिअॅक्शन येते ती खूपच भयंकर आहे.
गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एका स्टेडिअमध्ये असतात आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला प्रपोज करतो. मात्र गर्लफ्रेंड त्याच्यासोबत धक्कादायक गोष्ट करते. ती त्याला चापट मारते आणि त्याच्या अंगावर हातातील ड्रिंक फेकते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बॉयफ्रेंड गर्लफेंड स्टेडिअमध्ये आहेत. दोघेही रोमान्स करत असतात. अचानक बॉयफ्रेंड गुडघ्यावर बसतो आणि रिंग काढतो. गर्लफ्रेंडला प्रपोज करणार तोच ती शॉक होते. तरुणीला वाटतं की त्यात हिऱ्याची किंवा सोन्याची अंगठी असेल आणि प्रियकर तिचं स्वप्न भंग करतो. सोन्याच्या किंवा डायमंडच्या अंगठीऐवजी, बॉक्समधून कँडी रिंग बाहेर काढतो. हे पाहून तरुणी त्याला चापट मारते. ती एवढ्यावरच थांबत नाही. ती त्याच्या अंगावर ड्रिंकही फेकते. बॉयफ्रेंडसहित स्टेडिअमधील लोकही तिच्या या रिअॅक्शनवर थक्क होतात.
advertisement
@NoCapFights नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Propose Video : बॉयफ्रेंडनं गर्लफेंडला केलं प्रपोज, मात्र तिनं लगावली थोबाडीत; नेमकं काय झालं?
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement