सुहागरातला जवळ आले नवरा-नवरी, दोघांचाही मृत्यू, लग्नाच्या पहिल्या रात्री काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding first night : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू आणि वर दोघंही खोलीत गेले आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इथं एका घरात वधूच्या स्वागताची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती. शेवटी वर त्याच्या वधूसह घरी परतला. सर्व विधी पूर्ण झाले आणि शेवटी लग्नाच्या रात्रीची वेळ आली. वधू आणि वर दोघंही खोलीत गेले आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला.
हे प्रकरण कॅन्ट पोलीस स्टेशनच्या सहदगंज मुरावण टोला येथील आहे. इथं एका जोडप्याने आनंदाने लग्न केलं. घरातले सगळे खूप आनंदी होते. पण, दुसऱ्याच क्षणी हा आनंद शोकात बदलला. खरंतर, लग्नाच्या रात्री, वधू आणि वर एका छान खोलीत गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत जेव्हा कोणी बाहेर आलं नाही, तेव्हा कुटुंबाने वधूला उठवण्यासाठी हाक मारली. पण आतून आवाज न आल्याने सर्वजण घाबरले आणि त्यांनी दरवाजा तोडला.
advertisement
दरवाजा तोडताच सर्वांना धक्का बसला. खरं तर, वर खोलीत छताला बांधलेल्या फाशीला लटकलेला आढळला. वधू बेडवर मृतावस्थेत आढळली. डॉक्टरांना लगेच बोलावण्यात आलं. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. मग काय झालं.
कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरं कारण समोर येईल.
view commentsLocation :
Delhi
First Published :
March 10, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/Viral/
सुहागरातला जवळ आले नवरा-नवरी, दोघांचाही मृत्यू, लग्नाच्या पहिल्या रात्री काय घडलं?


