ऐकावं ते नवल! 24 ला लग्न, 25 ला सुहागरात, 26 ला झालं बाळ, रिपोर्ट पाहून सगळेच धक्क्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नवीन सून अचानक ओरडू लागली, रडू लागली. आपल्या पोटात दुखत असल्याचं तिनं सांगितलं. तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं.
प्रयागराज : आपल्याला मूल हवं असं लग्नानंतर प्रत्येक कपलला वाटतं. त्यासाठी प्लॅनिंग केली जाते. सामान्यपणे बाळ 9 महिने पोटात असतं. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, एक असं प्रकरण. ज्यात कपलचं लग्न झालं, दुसऱ्या दिवशी त्यांची सुहागरात झाली आणि तिसऱ्याच दिवशी बाळही झालं. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
उत्तर प्रदेशमधील या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. करचना तहसीलमध्ये ही घटना. 24 फेब्रुवारी रोजी येथील एका तरुणाच्या लग्नाची मिरवणूक जसरा गावात निघाली. लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटुंबाने वऱ्हाड्यांचं जोरदार स्वागत केलं. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. रात्री उशिरापर्यंत लग्नाचा सोहळा सुरू होता. दुसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारीला वधूची सासरी पाठवणी करण्यात आली.
advertisement
घरात आनंदी वातावरण होते. निरोपानंतर वधू सासरच्या घरी पोहोचताच पाहुण्यांचे येणं-जाणं वाढलं. नवविवाहित वधूला पाहण्यासाठी परिसरातील लोक आणि नातेवाईक येऊ लागले. 'मुहान दिखाई' चा कार्यक्रम दिवसभर सुरू राहिला. यानंतर सर्वजण झोपायला गेले.
advertisement
दुसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी, जेव्हा सून उठली, तेव्हा तिने चहा बनवला आणि सर्वांना दिला. घरात आनंदाचे वातावरण होतं. त्याच संध्याकाळी सून अचानक ओरडू लागली, रडू लागली. आपल्या पोटात दुखत असल्याचं तिनं सांगितलं. तिला ताबडतोब करचना सीएचसीमध्ये नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा ती प्रेग्नंट असल्याचं आढळून आलं आणि यानंतर 2 तासांनीच तिने एका बाळाला जन्म दिला.
advertisement
सासरच्यांनी मुलाला स्वीकारायला नकार दिला. त्यांनी तिच्या पालकांना बोलावलं आणि तुमची मुलगी प्रेग्नंट होती हे का सांगितलं नाही, असा जाब विचारला. त्यावेळी नवरदेव लग्नाआधी मुलीला भेटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, मुलीचे लग्न गेल्या वर्षी मे महिन्यात ठरलं होतं. तेव्हापासून मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटत होते. पण वराने सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आणि नवरीलाही स्वीकारायला नकार दिला. त्यांनी दिलेलं सामानही परत मागितलं.
advertisement
दरम्यान मुलीच्या कुटुंबाने हुंडा घेऊन लग्न लावल्याचा आरोप केला आहे. मुलीला सोबत नेलं नाही तर कारवाई करू असा इशाराही तिच्या कुटुंबाने तिच्या सासरच्यांना दिला.
Location :
Delhi
First Published :
March 04, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/Viral/
ऐकावं ते नवल! 24 ला लग्न, 25 ला सुहागरात, 26 ला झालं बाळ, रिपोर्ट पाहून सगळेच धक्क्यात