58 तास 35 मिनिटं 58 सेकंद एकमेकांना किस, Kissing Record केल्यानंतर 12 वर्षांनी कपलसोबत नको तेच घडलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Kissing Record : एका कपलने तब्बल 58 तास एकमेकांना किस केलं. त्यांच्या किसिंगचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला. पण आता या कपलबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नवी दिल्ली : किस करणं किंवा चुंबन घेणं ही कपलमधील एक प्रेमाची भावना. फार फार तर एखादं कपल किती वेळ किस करत असेल, काही मिनिटं, काही तास पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल थायलंडमधील एका कपलने तब्बल 58 तास एकमेकांना किस केलं. त्यांच्या किसिंगचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला. पण आता या कपलबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
2013 च्या व्हॅलेंटाईन डे निमित्त थायलंडच्या पट्टाया शहरात किसिंगची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. थायलंडच्या म्युझियम रिपल्स बिलीव्ह इट अँड नॉट की या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त आयोजित या स्पर्धेत 9 जोडप्यांनी सहभाग घेतला होता.
advertisement
हा विक्रम करणं सोपं नव्हतं. सहभागींना स्थिर उभं राहावं लागलं आणि त्यांचे ओठ कोणत्याही परिस्थितीत वेगळे होऊ नयेत, अशी अट होती. जेवताना, काहीही पिताना आणि बाथरूमला जातानाही ते एकमेकांशी जोडलेले राहिले. स्पर्धेदरम्यान, काही जोडपी थकवा आणि अस्वस्थतेमुळे बाहेर पडली, परंतु एक्काचाय आणि लक्साना यांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि प्रेमाने त्यांना विजेते बनवले.
advertisement
12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान जगातील सर्वात लांब चुंबनाचा रेकॉर्ड त्यांनी केला. या जोडप्याने 58 तास 35 मिनिटेआणि 58 सेकंद एकमेकांचे चुंबन घेत विक्रम केला होता. या थाई जोडप्याने यापूर्वी 2011 मध्ये 46 तास, 24 मिनिटे चुंबन घेऊन विक्रम केला होता आणि 2013 मध्ये तो मोडला होता.
advertisement
जगातील सर्वात लांब चुंबन घेण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या या जोडप्याने आता जगाला चकित करणारा निर्णय घेतला आहे. या जोडप्याने आता एकमेकांपासून वेगळं होत असल्याचं सांगितलं आहे.
Location :
Delhi
First Published :
March 04, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/Viral/
58 तास 35 मिनिटं 58 सेकंद एकमेकांना किस, Kissing Record केल्यानंतर 12 वर्षांनी कपलसोबत नको तेच घडलं