Buldhana News : घरात खोदकाम करताना सापडलं असं काही की...बघायला अख्ख गाव जमलं!

Last Updated:

बुलढाण्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेत एका घरात खोदकाम करताना एका शेष नागाची मुर्ती सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच अख्खं गाव ही मुर्ती पाहायला जमायला लागलं आहे.

buldhana news
buldhana news
Buldhana News : राहुल खंडारे, जिल्हा बुलढाणा : बुलढाण्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेत एका घरात खोदकाम करताना एका शेष नागाची मुर्ती सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच अख्खं गाव ही मुर्ती पाहायला जमायला लागलं आहे. त्यामुळे गावात एकच गर्दी जमली आहे. या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मांडका येथील वामन खंडारे यांच्या घरात ही घटना घडली आहे. वामन खंडारे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचे पहिले खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी शेष नागाची मूर्ती खोदकामात निघाली आहे. त्यांनतर खंडारे परिवारासह गावकऱ्यांना एकच आश्चर्याचा धक्का बसला आहे.दरम्यान या घटनेची माहिती पसरताच आता नागरीकांनी मुर्ती पाहण्यासाठी रांगा लावायला सूरूवात केली आहे.
advertisement
खोदकामात मुर्ती सापडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी ती वर काढून महादेव मंदिरात तिची विधिवत पूजाच्या करून ठेवण्यात आली आहे. या घटनेची परिसरात वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मांडका या ठिकाणी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने मूर्ती बघण्याकरता गर्दी करत आहे. त्यामुळे गावात रांगा लागल्या आहेत.त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

खोदकामात खजिना सापडला

उत्तर प्रदेशातील जालौन येथे काहीसा असाच प्रकार घडला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या घराचे बांधकाम करण्यासाठी खांब उभारण्याकरिता खोदकाम सुरू असताना मोठा खजिना सापडला आहे. या खजिन्यात चांदीच्या नाण्यांचा समावेश असून, ही नाणी 150 वर्षांपूर्वीची असावीत असं सांगितलं जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही नाणी जप्त केली आहेत.
advertisement
उत्तर प्रदेशातील जालौन येथे एका घराच्या बांधकामासाठी खांब उभारण्याकरिता खोदकाम सुरू असताना इसवी 1800 मधील जुनी चांदीची नाणी सापडली आहेत. खोदकाम करताना चांदीची नाणी सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी ही माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही नाणी जप्त केली. खोदकामादरम्यान सापडलेली नाणी 150 वर्षांपूर्वी असल्याचं बोललं जात आहे
view comments
मराठी बातम्या/Viral/
Buldhana News : घरात खोदकाम करताना सापडलं असं काही की...बघायला अख्ख गाव जमलं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement