Bullet Train : एका पक्ष्यामुळे सुसाट धावतेय बुलेट ट्रेन; तुम्हाला माहिती नसेल ही स्टोरी

Last Updated:

जपानी बुलेट ट्रेनच्या डिझाइनमध्ये अडचण होती, आज एका पक्ष्यामुळे ती धावते आहे. नाहीतर खूप आधीच बंद पडली असती.

बुलेट ट्रेन
बुलेट ट्रेन
नवी दिल्ली :  भारतात बुलेट ट्रेन धावण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. देशातील पहिला हाय-स्पीड ट्रेन प्रकल्प मुंबई-अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे. या प्रकल्पाचा पहिला भाग 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यावर जपानची शिंकनसेन ई-5 सीरिज बुलेट ट्रेन धावेल. पण तुम्हाला माहिती आहे का? जपानी बुलेट ट्रेन सुसाट धावतेय ती एका पक्ष्यामुळे.
बुलेट ट्रेन ही आधुनिक अभियांत्रिकीची देणगी आहे ज्याचा प्रत्येक जपानीला अभिमान आहे. 515 किमी लांबीची टोकाइदो शिंकानसेन ही जगातील सर्वात व्यस्त हाय-स्पीड रेल्वे लाइन आहे, जी 1964 ते 2010 सालापर्यंत या ट्रेनमध्ये सुरू झाल्यापासून 4.9 अब्ज प्रवासांनी प्रवास केला आहे. पण एक काळ असा होता की जपानी बुलेट ट्रेन बंद कराव्या लागतील असं वाटत होतं. पण किंगफिशर या पक्ष्याने त्यांना नवजीवन दिलं.
advertisement
खूप यायचा आवाज
सुरुवातीला या गाड्यांच्या डिझाइनमध्ये अडचण होती. ट्रेन बोगद्यातून बाहेर पडल्यावर एवढा आवाज व्हायचा की लोकांना सहन व्हायचा नाही. ही ट्रेन जिथून जायची तिथं जवळ राहणाऱ्या लोकांनाही तिचा आवाज सहन करणं सोपं नव्हतं.  या आवाजाचं कारण समजलं. ट्रेन बोगद्यातून बाहेर पडल्यावर बंद जागेमुळे ती हवा पुढे ढकलते त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. बंदुकीतून गोळी सुटावी तशी ट्रेन बोगद्यातून बाहेर येते. त्यामुळे 70 डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण होतो आणि 400 मीटरच्या आत राहणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होतो.
advertisement
किंगफिशरकडून प्रेरणा
आवाजाचं कारण सापडलं पण आता त्यावर उपाय काय हा प्रश्न होता. आवाज कमी करता यावा यासाठी ट्रेनचा आकार पुन्हा डिझाइन करण्याचं आव्हान इंजिनीअर्ससमोर होतं. जपानी रेल्वेच्या तांत्रिक विकास विभागाचे महाव्यवस्थापक आणि अभियंता इजी नाकत्सू यांनी याचं उत्तर निसर्गातून शोधलं. नाकात्सू यांना त्यांच्या पक्षी-निरीक्षण अनुभवांवरून किंगफिशरची आठवण झाली.
advertisement
किंगफिशर हा एक पक्षी, जो आपल्या भक्ष्याची शिकार करण्यासाठी पाण्यात डुबकी मारतो. त्याच्या चोचीच्या आकारामुळेच तो स्वच्छंदपणे पाण्यात जातो. त्याची चोच पुढच्या बाजूला अरुंद आणि मागच्या बाजूला रुंद असते. त्याच्या चोचीची रचना जपानी अभियंत्यांसाठी वरदान ठरली.
जपानी अभियंत्यांच्या प्रयत्नाला यश
इजी यांनी बुलेट ट्रेनचा पुढचा भाग किंगफिशरच्या चोचीसारखा डिझाइन केला. यामुळे केवळ आवाज कमी करण्यात यश आलं नाही तर ट्रेनमधील इंधनाचा वापरही कमी झाला. डिझाइनमध्ये बदल केल्यानंतर, ट्रेन आता ताशी 320 किमी वेगानं धावू शकते आणि सरकारने ठरवलेल्या कठोर आवाज मानकांची पूर्तता करण्यातही ती यशस्वी झाली.
advertisement
आज किंग फिशरच्या चोचीप्रमाणे असलेलं बुलेट ट्रेनचं नाक, म्हणजे ट्रेनचा पुढचा भाग हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. जे 15 मीटर लांब आहे.
मराठी बातम्या/Viral/
Bullet Train : एका पक्ष्यामुळे सुसाट धावतेय बुलेट ट्रेन; तुम्हाला माहिती नसेल ही स्टोरी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement