दुकानात ठेवलेल्या झाडूवर कॅलरी चार्ट, पौष्टिक झाडूचा PHOTO VIRAL
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सोशल मीडिया आता लोकांच्या जीवनातील अविभाष्य घटक बनला आहे. उठता बसता काय करतात लोक याचीही स्टोरी सोशल मीडियावर शेअर करतात.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : सोशल मीडिया आता लोकांच्या जीवनातील अविभाष्य घटक बनला आहे. उठता बसता काय करतात लोक याचीही स्टोरी सोशल मीडियावर शेअर करतात. कोणतीही नवी गोष्ट मार्केटमध्ये आली तर ती अवघ्या काही क्षणात इंटरनेटवर व्हायरल होत असते. मग ती कोणताही खाण्याचा पदार्थ असो किंवा घरात वापरण्याची एखादी गोष्ट. सध्या सोशल मीडियावर एका झाडुच्या फोटोनं लक्ष वेधलंय. या झाडुमध्ये काय खास आहे याविषयी जाणून घेऊया.
खाण्यामध्ये जसं पौष्टिक पदार्थ असतात तसंच झाडुमध्ये असेल तर? तुम्ही कधी पौष्टिक झाडुविषयी ऐकलंय का? या झाडुचा फोटो सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
पौष्टिक खाण्यामध्ये जसं कॅलरीज, प्रथिने, फॅट्स असतात तसंच या पौष्टिक झाडुमध्ये आहे. एका दुकानातील झाडुचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या झाडुच्या फोटोवर कॅलरी चार्ट दिला आहे. त्यामुळे हा झाडू सध्या प्रकाश झोतात येत जोरदार व्हायरल होत आहे.
advertisement
the broom has a calorie chart …
in case you decide to snack on it! pic.twitter.com/II0N82b69k
— JΛYΣƧΉ (@baldwhiner) August 2, 2023
@baldwhiner नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा झाडुचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो व्हायरल होताच काही वेळातच इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळाला. फोटोवर अनेक निरनिराळ्या कमेंट येत आहेत. लोक या पौष्टिक झाडुची मजा घेत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2023 1:38 PM IST


