बापरे! चक्क म्हशीच्या पाठीवर उभं राहून 2 महिलांचा डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लोक प्रसिद्धीसाठी, चर्चेत येण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर अशा लोकांचे एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ असतात. आपण विचारही केला नसेल अशा विचित्र, मजेशीर गोष्टी लोक करतात.
नवी दिल्ली: लोक प्रसिद्धीसाठी, चर्चेत येण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर अशा लोकांचे एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ असतात. आपण विचारही केला नसेल अशा विचित्र, मजेशीर गोष्टी लोक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये दोन महिलांनी प्रसिद्धीसाठी चक्क म्हशीवर उभं राहून डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहे.
तुम्ही आत्तापर्यंत अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असतील. वेगवेगळ्या ठिकाणांवर शूट केलेले व्हिडीओ पाहिले असतील. मात्र कधी म्हशीवर चढून डान्स केल्याचा प्रकार पाहिलाय का? दोन महिला चक्क म्हशीवर उभं राहून ते पण साडीमध्ये डान्स करत आहे. काहीच वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनवला.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कशा दोन महिला म्हशीवर उभ्या आहेत. त्या मस्त हातवारे करुन नाचत आहेत. राजस्थानमधील एका गावातील हा व्हिडीओ आहे. prince__rajasthani नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतात व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ मजेशीरपणे घेत त्यांची खिल्ली उडवली आहे तर काहींनी म्हटलं की जनावरांसोबत हे गैरवर्तन आहे.
advertisement
advertisement
दरम्यान, सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. प्रसिद्धीच्या नादात आपण काय करतोय हे बऱ्याचदा लोकांना समजत नाही. मग असे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रोल केले जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2024 8:35 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बापरे! चक्क म्हशीच्या पाठीवर उभं राहून 2 महिलांचा डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण









