UPI, NEFT आणि IMPS तिघांमध्ये कोणतं कधी वापरलं जातं? अजूनही अनेकांना चुकीची माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बऱ्याच वेळा लोकांना या तिघांमधील नेमका फरक समजत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून यातील फरक सोप्या शब्दात सांगणार आहोत.
मुंबई : भारतात आता सर्वच पैशाचे व्यवहार ऑनलाइन होऊ लागले आहेत. ज्यामुळे लोकांचा बँकेत जाण्याचा वेळ वाचतो. पेमेंट सिस्टिम अधिकाधिक सुलभ आणि वेगवान बनवण्यासाठी UPI, NEFT आणि IMPS हे तिन्ही पर्याय वापरले जातात. मात्र, बऱ्याच वेळा लोकांना या तिघांमधील नेमका फरक समजत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून यातील फरक सोप्या शब्दात सांगणार आहोत.
UPI म्हणजे "Unified Payments Interface" ही एक आधुनिक आणि रिअल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. तुम्ही कोणत्याही वेळी अगदी दिवसा किंवा रात्री, सुट्टीच्या दिवशी सुद्धा सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी फक्त UPI अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करून मोबाइल नंबर किंवा UPI ID चा वापर करून पैसे पाठवता येतात.
NEFT म्हणजे "National Electronic Funds Transfer". ही प्रणाली थोडी जुनी असून यामध्ये पैसे 'बॅच' मध्ये पाठवले जातात. म्हणजे एकावेळी बरेच व्यवहार प्रोसेस केले जातात. यामध्ये पैसे पाठवताना थोडा वेळ लागू शकतो, विशेषतः जर व्यवहार ऑफिसच्या वेळेत नसेल तर. NEFT व्यवहार दिवसात काही निश्चित वेळेतच केले जातात, पण आता बहुतांश बँकांनी ही सेवा 24x7 उपलब्ध केली आहे.
advertisement
IMPS म्हणजे "Immediate Payment Service", ही एक अशी सेवा आहे जी UPI प्रमाणेच रिअल टाइममध्ये पैसे ट्रान्सफर करते. पण यामध्ये व्यवहारासाठी मोबाइल नंबर आणि MMID किंवा IFSC कोडसह अकाउंट नंबर वापरावा लागतो. ही सेवा 24 तास उपलब्ध असते आणि तत्काळ पैसे पोहोचवते.
थोडक्यात सांगायचं झालं, तर जर तुम्हाला झटपट आणि सोप्पा मार्ग हवा असेल, तर UPI हा सर्वात सोपा आणि सुलभ पर्याय आहे. NEFT थोडा पारंपरिक पद्धतीचा असून तो काही प्रमाणात वेळखाऊ असतो, तर IMPS ही सुद्धा तत्काळ सेवा आहे, पण तिच्यासाठी काही विशिष्ट माहिती लागते. हे तिन्ही पर्याय डिजिटल व्यवहाराच्या दुनियेत एकमेकांपेक्षा वेगळ्या गरजांनुसार उपयुक्त ठरतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 7:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
UPI, NEFT आणि IMPS तिघांमध्ये कोणतं कधी वापरलं जातं? अजूनही अनेकांना चुकीची माहिती


