Wild Life : जंगल सफारीदरम्यान पर्यटकांच्या गाडीसमोर आला वाघ, पुढे घडलं असं की....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी त्यांची लाइफस्टाइल जाणून घेण्यासाठी, वन्य जीवनाचा अनुभव घेण्यासाठी लोक जंगल सफारीवर जात असतात. जंगल सफारीदरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ लोक सोशल मीडियावर शेअर करतात.
नवी दिल्ली : प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी त्यांची लाइफस्टाइल जाणून घेण्यासाठी, वन्य जीवनाचा अनुभव घेण्यासाठी लोक जंगल सफारीवर जात असतात. जंगल सफारीदरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ लोक सोशल मीडियावर शेअर करतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये पर्यटकांच्या गाडी समोर अचानक वाघ येतो त्यानंतर त्यांची जी हालत होते ती तर खूपच भयानक.
जंगलामध्ये एकापेक्षा एक धोकादायक आणि भयंकर प्राणी आहेत. जंगल सफारीवर गेल्यावर यातील अनेक प्राणी दिसतात. मात्र काही प्राणी अचानक गाडी समोर येतात, हल्ला करतात. सध्या समोर आलेल्या घटनेत असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला. जंगल सफारीवर गेलेल्या पर्यटकांच्या गाडीसमोर वाघ येतो.
जंगल सफारीदरम्यानच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही पर्यंटक गाडीमध्ये थांबले आहेत. समोरुन दबक्या पावलांत वाघ त्यांच्याकडे येतोय. अचानक वाघ पर्यटकांच्या गाडीकडे धावतो त्यामुळे पर्यटक घाबरुन जातात. पर्यकांची हालत खराब होते ते गाडी चालू करुन निघणारच वाघ दुसऱ्या दिशेनं निघून जातो. हा क्षण श्वास रोखणारा होता.
advertisement
advertisement
Joju Wildjunket नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत.
जिम कॉर्बेटच्या जंगलातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं की, जिम कॉर्बेटच्या गार्डियन झोनमध्ये वाघाने हवेत थरथरत्या गर्जना केल्या. या गर्जनेनं पर्यटक तर पुरते घाबरले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2024 6:37 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Wild Life : जंगल सफारीदरम्यान पर्यटकांच्या गाडीसमोर आला वाघ, पुढे घडलं असं की....









