कुत्र्याला खाऊ घातलं, मग केली मैत्री, 'त्या' रात्री कुत्रा राहिला शांत; चोराने साधला डाव अन् केली मोठी चोरी!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
खांडव्यातील एक अनोखी चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्याने 5 दिवस सतत भाकर, भाजी आणि मांस देऊन घरातील कुत्र्याशी मैत्री केली. चोरीच्या रात्री...
चोरीच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रात ठळकपणे छापून येतात, पण खांडव्यातून समोर आलेली ही घटना खरोखरच धक्कादायक आणि एखाद्या सिनेमातील कथेसारखी आहे. इथे एका चोरट्याने चोरी करण्याआधी घरातील पाळीव कुत्र्याला आपला मित्र बनवले, तेही सलग 5 दिवस त्याला भाकरी आणि मांस खाऊ घालून. ज्या रात्री चोरी करण्याची वेळ आली, त्या रात्री कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर भुंकणारा तो कुत्रा पूर्णपणे शांत राहिला.
कुठे घडली घटना?
हा संपूर्ण प्रकार मध्य प्रदेशातील खांडवा शहरातील इंदूर नाका परिसरातील आहे, जिथे हरिलाल नावाचे व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घरात एक पाळीव कुत्रा देखील आहे, जो खूप सतर्क आणि हुशार आहे. हरिलाल सांगतात की, 'आमचा कुत्रा रात्री कोणत्याही आवाजाकडे दुर्लक्ष करत नाही, पण त्या रात्री तो पूर्णपणे शांत होता.'
advertisement
आधी चोर बनला 'कुत्र्याचा मित्र' आणि मग नेले सोने
हरिलाल यांचा आरोप आहे की, जवळच्या पवन चौक परिसरात राहणारा गंगाराम नावाचा एक तरुण अनेक दिवसांपासून त्यांच्या घराभोवती फिरताना दिसला होता. दररोज संध्याकाळी तो कुत्र्याला खायला भाकर, भाजी आणि कधीकधी मांसही आणायचा. सुरुवातीला आम्हाला काही संशय आला नाही; आम्हाला वाटले की तो शेजारचाच मुलगा आहे. पण चोरीच्या रात्री सत्य समोर आले.
advertisement
चोरीची रात्र : जेव्हा सगळे झोपले होते, अगदी कुत्राही
चोरीच्या रात्री जवळच वाढदिवसाची पार्टी होती. हरिलालचे कुटुंब त्यात सहभागी झाले आणि रात्री उशिरा झोपायला गेले. रात्री सुमारे 1 वाजता चोर घरात घुसला आणि कपाटातून 5 सोन्याची नाणी घेऊन पसार झाला. दुसऱ्या सकाळी जेव्हा आम्ही पाहिले, तेव्हा कपाट उघडे होते, दागिने गायब होते आणि कुत्रा अजूनही शांत बसला होता.
advertisement
गंगारामच्या घरात काही मोती सापडले
हरिलाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गंगारामची चौकशी केली, पण त्याला सोडून देण्यात आले. मात्र, घराशेजारी जमिनीवर काही मोती पडलेले आढळले, ज्यामुळे गंगारामच्या घरापर्यंत पोहोचता आले आणि संशय अधिक वाढला आहे. आता हरिलाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जनसुनावणीत धाव घेतली असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 13, 2025 1:43 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कुत्र्याला खाऊ घातलं, मग केली मैत्री, 'त्या' रात्री कुत्रा राहिला शांत; चोराने साधला डाव अन् केली मोठी चोरी!


