पेटत्या लायटरशी करत होता स्टंट, अचानक लागली संपूर्ण चेहऱ्याला आग, VIDEO पाहून नेटकरी Shocked 

Last Updated:

एका तरुणाने लाईटर वापरून खतरनाक स्टंट करण्याचा प्रयत्न केला. त्याने लाईटर तोंडात धरले आणि पेटवले, ज्यामुळे त्याचा चेहरा आगीत सापडला. त्याने हाताने आग विझवली.

News18
News18
आपण अनेकदा चित्रपट आणि रिॲलिटी शोमध्ये कलाकारांना जबरदस्त स्टंट करताना पाहतो. मात्र, अशा स्टंटच्या सुरुवातीलाच एक इशारा असतो – "हे स्टंट प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहेत, कृपया प्रयत्न करू नका." म्हणजेच, स्टंट करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं, अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अगदी व्यावसायिक स्टंटमॅनदेखील हे सर्व सुरक्षा उपाय घेऊनच करतात.

स्टंट करताना मोठी चूक, चेहऱ्यावर पेटली आग

पण एका तरुणाने कॅमेऱ्यासमोर स्टंट करताना मोठी चूक केली आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या तरुणाने तोंडात लायटर धरून एक असा स्टंट केला की, त्याचा संपूर्ण चेहरा आगीने झाकला गेला. काही क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावर जणू आगीचा गोळा तयार झाला आणि हा धक्कादायक प्रकार पाहून कुणालाही भीती वाटेल.
advertisement

नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, हा तरुण आपल्या तोंडात लायटर धरतो आणि दुसऱ्या हातातही एक पेटलेला लायटर असतो. जसा तो तोंडात असलेला लायटर तोडतो, तसा आगीचा भडका उडतो. काही सेकंदांत त्याचा चेहरा आगीने झाकला जातो. मात्र, प्रसंगावधान राखून तो झटकन हातांनी आग विझवतो.
advertisement

व्हिडिओ व्हायरल, 'Ghost Rider' ची आठवण

हा धक्कादायक व्हिडिओ Instagram वर dirwannnnnnnnn या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या क्लिपला 18 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

  • एका युजरने लिहिलं - "हेच म्हणतात मृत्यूच्या जबड्यातून सुटणं!"
  • दुसऱ्याने कमेंट केली - "जेव्हा मुलांना काही करायला मिळत नाही, तेव्हा ते असं करतात."
  • तिसरा म्हणतो - "म्हणूनच मुलांची सरासरी आयुष्य कमी असते!"
  • एकाने लिहिलं - "देवाने त्याला दुसरं जीवन दिलं आहे."
advertisement
बर्‍याच युजर्सनी हा व्हिडिओ पाहून 'Ghost Rider' या प्रसिद्ध चित्रपटाची आठवण झाल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून, स्टंट करताना काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
पेटत्या लायटरशी करत होता स्टंट, अचानक लागली संपूर्ण चेहऱ्याला आग, VIDEO पाहून नेटकरी Shocked 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement