विमान जमिनीपासून किती अंतरावर उडतं? तुम्हाला माहितीय का याचं उत्तर

Last Updated:

भारतीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात दररोज 6000 विमानं उड्डाण करतात. त्यांपैकी 3061 विमानं भारताबाहेर जाणारी तर 3058 विमानं भारतात येणारी असतात. यात भारतीय आणि परदेशी विमानांचा समावेश आहे.

विमान जमिनीपासून किती अंतरावर उडतं?
विमान जमिनीपासून किती अंतरावर उडतं?
नवी दिल्ली : भारतीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात दररोज 6000 विमानं उड्डाण करतात. त्यांपैकी 3061 विमानं भारताबाहेर जाणारी तर 3058 विमानं भारतात येणारी असतात. यात भारतीय आणि परदेशी विमानांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात भारतात सरासरी 2,891 विमानांनी उड्डाण केलं. अमेरिकेत ही संख्या 42,000 आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला तिथे एका वेळी 5000 विमानं उड्डाण करत असतात. एकमेकांना धडक न देता विमानांचं प्रस्थान, आगमन आणि उड्डाण व्हावं यासाठी काही विशेष गोष्टींची गरज असते. विमानं किती उंचीवरुन उडतात ही गोष्टही अशा वेळी महत्त्वाची ठरते. विमान हे सहसा जमिनीपासून नऊ ते 12 किलोमीटर उंचीवर उड्डाण करतं. त्यामागील कारणं जाणून घेऊया.
ट्रिप डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार जगभर दररोज सुमारे एक लाख विमानं टेक ऑफ करतात आणि लॅंड होतात. यात प्रवासी, मालवाहू आणि सैन्यदलांच्या विमानांचा समावेश असतो. सुमारे 90,000 विमानं दररोज केवळ प्रवासी वाहतूक करतात. विमान सर्वसाधारणपणे 31,000 ते 42,000 फूट म्हणजे 9.44 ते 12.80 किलोमीटर उंचीवरून उडतात. इंधनाची कार्यक्षमता वाढवणं, हवेचा प्रतिकार कमी करणं, हवाई वाहतूक मार्गावरील वर्दळ टाळणं आणि सुरक्षितता ही या मागील प्रमुख कारणं आहेत.
advertisement
विमान जमिनीपासून किती उंच उडवायचं आणि का याची काही महत्त्वाची कारणं आहेत. जमिनीपासून अधिकाधिक उंच गेल्यानंतर हवेची घनता कमी होते. त्यामुळे हवेचा प्रतिकार कमी होतो. त्यामुळे कमी इंधन वापरुन विमान वेगाने अंतर कापतं. आधुनिक जेट किंवा टर्बोफाईन प्रकारातील विमानं अधिक उंचीवर जास्त कुशलपणे प्रवास करतात. जास्त उंचावरुन विमान उडवल्यामुळे पक्ष्यांशी टक्कर होण्याची शक्यता कमी होते. त्याशिवाय शांतपणे उड्डाण होत असल्यामुळे प्रवास सुखकर होतो. ढगांच्या वरून विमानं उडवण्यामुळे ती वेगाने उडू शकतात. विश्लेषकांच्या मते विमान जेवढं जास्त उंचीवर जाईल तेवढी हवा विरळ होत जाते. त्यामुळे विमानं अधिक सक्षमपणे उड्डाण करु शकतात. त्यामुळेच मोठ्या जेट्ससह विमानं जेव्हा टेक ऑफ करतात तेव्हा त्यांचं पहिलं काम शक्य तेवढ्या वेगाने ढगांच्या वर जास्तीत जास्त उंचीवर जाणं हे असतं.
advertisement
कमर्शिअल विमानं सहसा 31,000 ते 38,000 फूट म्हणजे 9.4 ते 11.5 किलोमीटर उंचावर जातात. या उंचीवर पोहोचण्यासाठी विमानांना दहा मिनिटं लागतात. खरं तर यापेक्षा किती तरी जास्त उंचीवर विमानं उडू शकतात मात्र त्यामुळे सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. विमान जेवढं उंच जाईल तेवढा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित उंचीवर येण्यासाठी त्याला लागणारा वेळ जास्त.
advertisement
विमानांचं वजन हे ही एक महत्त्वाचं कारण आहे. विमान जसजसं उंच जातं तसतसं त्याचं वजन बदलतं. जेट इंधनाचं वजन सुमारे 6.7 पाउंड प्रति गॅलन एवढं असतं. त्यामुळे उड्डाण करताना जेवढं अधिक इंधन जळेल तेवढं त्या इंधनाचं वजन कमी होईल. त्या उंचीवर विरळ हवेमुळे हवेचा प्रतिरोधही उत्पन्न होतो. शिवाय विमान जेवढ्या जास्त उंचीवर असेल तेवढा त्याचा वेगही वाढतो. 10,000 फूट आणि त्यावर गेल्यास विमानं अधिक वेगाने प्रवास करु शकतात.
advertisement
लहान विमानं मात्र एवढ्या उंचीवरुन उड्डाण करु शकत नाहीत. ही विमानं पिस्टन संचालित इंजिनांचा वापर करतात. ती कारच्या इंजिनप्रमाणे असतात. त्यांची क्षमता मर्यादित असते. त्यामुळे ती लहानसहान उड्डाणांसाठीच अधिक योग्य असतात. त्यात प्राणवायूची समस्याही असते. या अडचणी मोठ्या कमर्शियल विमानांमध्ये जाणवत नाहीत. आता या सगळ्या माहितीनंतर हेलिकॉप्टरबाबत काय?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण मुळात हेलिकॉप्टर्सचा वापर जवळच्या अंतरासाठी केला जातो. ती विमानांच्या तुलनेत खूप कमी उंचीवरून म्हणजे 10,000 हजार फुटांपेक्षा खालून उड्डाण करतात. त्यांना पंख नसतात तर फिरणारी पाती असतात. त्यामुळे ती अधिक उंची गाठूही शकत नाहीत.
advertisement
विमानं कमी उंचीवरुन उडत असली तरीही कितीतरी वेळा त्यांना पक्ष्यांची धडक बसते. टेक ऑफ आणि लॅंडिंगमध्ये अडचणी येतात. विमानं जास्त उंचीवर उडतात तेव्हा मात्र त्यांना पक्ष्यांपासून कोणताही धोका नसतो. पक्षी हे बहुतेकवेळा 500 फुटांच्या खाली उडतात. काही पक्षी मात्र दोन ते पाच हजार फूट किंवा त्याहून उंच उडतात. रुपेल्स ग्रिफॉन जातीचं गिधाड हे सर्वाधिक म्हणजे सुमारे 37,000 फूट (11.3 किलोमीटर) उंचावर उडतं. बार हेडेड हंस 27,825 फुटांवर तर सारस क्रेन 33,000 फुटांवर उडू शकतात.
मराठी बातम्या/Viral/
विमान जमिनीपासून किती अंतरावर उडतं? तुम्हाला माहितीय का याचं उत्तर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement