लग्न झालं पण संसार... मंडपात घडली 'ही' दुर्दैवी घटना, कायमचं पुसलं गेलं नवरीचं कुंकू!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
लग्नाची धामधूम संपली होती, नवरदेव डोळ्यात स्वप्नं घेऊन बायकोसोबत घरी परतला होता. घरात आनंद होता. नवी नवरी घरी आली होती, संध्याकाळी डान्सचा कार्यक्रम होता. सर्वजण आनंदात होते. पण पुढे नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. सायंकाळी...
लग्नाची धामधूम संपली होती, नवरदेव डोळ्यात स्वप्नं घेऊन बायकोसोबत घरी परतला होता. घरात आनंद होता. नवी नवरी घरी आली होती, संध्याकाळी डान्सचा कार्यक्रम होता. सर्वजण आनंदात होते. पण पुढे नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. सायंकाळी डान्सचा कार्यक्रम सुरू झाला, त्याचवेळी नवरदेवाला विजेचा झटका बसला आणि त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात आनंदाची जागा स्मशानशांततेने घेतली.
...अन् संसार सुरू होण्याआधीच झालं होत्याचं नव्हतं
या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नववधू आणि नवरदेवाचे सोनेरी स्वप्न अक्षरशः धुळीस मिळाले. अजून नवं घर सजायचं होतं, पण त्याआधीच होत्याचं नव्हतं झालं. नवरदेवाने नवरीच्या हातातली मेहंदी आणि पायाला लावलेला लाल रंग पुसण्याआधीच जगाचा निरोप घेतला. नवरीच्या माथ्यावर कुंकू लागून काही तास उलटले असतील, आणि ते कुंकू कायमचं पुसलं गेलं. ही हृदयद्रावक घटना ओडिशा राज्यातील कटक जिल्ह्यातील महांगा नुर्तंग गावात घडली आहे.
advertisement
या खेळाने नवऱ्याचा घेतला जीव
लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांत नवरदेवाने आपल्या नववधूला सोडून कायमचा प्रवास केला. 7 मे रोजी महांगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नुर्तंग गावातील संतोष साहू यांचा एकुलता एक मुलगा सत्यमन्यू साहू याचा विवाह जज्जपूर जिल्ह्यातील छातीया भागात मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नानंतर सत्यमन्यू आपल्या नववधू सोबत घरी परतला होता. पुढे चतुर्थीची पिंड पडायची होती. हिंदू परंपरेनुसार, चतुर्थीच्या आधी वधू आणि वर मांडवात 'कूड्डी' नावाचा खेळ खेळतात आणि तोच कूड्डीचा खेळ नवरदेवासाठी, म्हणजेच सत्यमन्यूसाठी जीवघेणा ठरला.
advertisement
कुटुंब आणि नवरीची मानसिकता ढासळली
कूड्डीचा खेळ खेळत असताना, दुर्दैवाने सत्यमन्यूला मांडवात विजेचा धक्का बसला आणि त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला तातडीने महांगा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, पण त्याची नाजूक परिस्थिती पाहून त्याला कटकच्या मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच सत्यमन्यूच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीय, मित्र आणि गावकरी शोकाने पूर्णपणे खचून गेले होते. जणू काही सगळ्यांची वाचाच गेली होती. कोणाला काही बोलण्याची हिंमत नव्हती. या घटनेमुळे सगळेच सुन्न झाले आहेत, डोळ्यातून अश्रूही येईनासे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या अकाली मृत्यूनंतर वधूच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या घरी नेले आहे.
advertisement
हे ही वाचा : प्रेम केलं, लग्नही केलं, संसार सुरू होणार इतक्यात... नवऱ्याने असं काही केलं की, नवरीला बसला मोठा धक्का!
हे ही वाचा : आई, वडील, बहीण आणि आत्या... सगळ्यांची केली हत्या; यूट्यूब व्हिडीओ पाहून केला कांड, आता...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 16, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
लग्न झालं पण संसार... मंडपात घडली 'ही' दुर्दैवी घटना, कायमचं पुसलं गेलं नवरीचं कुंकू!