बायको पुढे पुढे, तो तिच्या मागे; कपलने रस्त्यात केलं असं काही, संपूर्ण गाव पाहत राहिलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband Wife Video : नवरा-बायकोचा हा व्हिडीओ. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक महिला ओरडत वेगाने धावत येताना दिसते. तिच्या मागे मागे एक पुरुष आहे.
लखनऊ : बायको पुढे पुढे आणि नवरा मागे मागे.... कपल रस्त्यावर धावत सुटलं. एखाद्या फिल्मचा सीन वाटावा असं हे दृश्य बराच वेळ रस्त्यावर धावल्यानंतर रस्त्यात असं काही घडलं की सगळ्यांना धक्का बसला. कपलच्या कृत्यामुळे सगळे शॉक झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही घटना चर्चेत आली आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवरा-बायकोचा हा व्हिडीओ. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक महिला ओरडत वेगाने धावत येताना दिसते. तिच्या मागे मागे एक पुरुष आहे. ज्याच्या हातात काठी दिसते आहे. हे पती-पत्नी असल्याचं सांगितलं जातं आहे. महिला पळत येते आणि समोर असलेल्या विहिरीत उडी मारते. तिच्या मागे मागे तिचा नवराही विहिरीत उडी मारतो. दोघंही विहिरीमध्ये उडी मारतात. हे सगळं इतकं अचानक घडतं की तिथे उपस्थित असलेले लोकही स्तब्ध होतात. ते पाहतच राहतात.
advertisement
@Digital_khan01 एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी महिलेबाबत सहानुभूती व्यक्त करत हे घरगुती हिंसाराचाराचं भयानक उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हे नाटक किंवा बनावट व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
पति की पिटाई से बचने के लिए पत्नी कुएं में कूदी।💔
उत्तर प्रदेश से दिल दहला देने वाला खबर महिला ने घरेलू हिंसा से बचने के लिए कुएं में छलांग लगा दी। ग्रामीणों ने बचाई जान।
घरेलू हिंसा के खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। pic.twitter.com/CxizwxWDJI
— Shagufta khan (@Digital_khan01) November 5, 2025
advertisement
या व्हायरल व्हिडीओचं ठिकाण, वेळ, त्यामागील स्टोरी, सत्यतेबाबत न्यूज18 पुष्टी करू शकत नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा केला जात आहे आणि लोक त्याबद्दल विविध दावे करत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका ग्रामीण भागातील असल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
पती-पत्नीत वाद झाले, या वादानंतर पतीच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी, पतीच्या छळाला कंटाळून महिलेने असं पाऊल उचल्याचा दावा केला जातो आहे. या व्हिडिओने लोकांना धक्का बसला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या समाजात घरगुती हिंसाचार कधी संपेल हा प्रश्न उपस्थित केला आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 07, 2025 10:07 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बायको पुढे पुढे, तो तिच्या मागे; कपलने रस्त्यात केलं असं काही, संपूर्ण गाव पाहत राहिलं


