advertisement

Viral Video : 'कमी शिकलोय त्यामुळेच जास्त कमावतोय'; डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून व्हाल चकित

Last Updated:

चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी मिळावी अशी जवळपास अनेकांची इच्छा असते. त्यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टींमधून शिक्षण घेऊन आपलं करिअर सेट करत असतात. कमी शिकलेलेही काही ना काही करताना पहायला मिळतात.

 डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून व्हाल चकित
डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून व्हाल चकित
नवी दिल्ली: चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी मिळावी अशी जवळपास अनेकांची इच्छा असते. त्यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टींमधून शिक्षण घेऊन आपलं करिअर सेट करत असतात. कमी शिकलेलेही काही ना काही करताना पहायला मिळतात. बऱ्याचदा तर शिकलेल्या लोकांपेक्षा कमी शिकलेले जास्त कमावतात. सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय, ज्यामध्ये डोसा बनवणारा व्यक्ती जे काही बोलते ते ऐकून सर्वच थक्क होतात.
डोसावाल्याचा समोर आलेला व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. डोसावाल्यानं जे म्हटलं ते ऐकल्यावर तुम्हीही चकित व्हाल. तो शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त कमावतो असं त्यांचं म्हणणं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोसावाला चीझ दाखवून व्यक्तीला कोणत्या कंपनीच आहे विचारत आहे. मग व्हिडीओ काढणारा व्यक्ती म्हणतो की मी शिकलेला आहे. यानंतर डोसावाला म्हणतो मी कमी शिकलेला आहे म्हणून जास्त कमावतोय. नाहीतर मलाही 30-40 हजारांची नोकरी करावी लागली असते.
advertisement
@ASHMANTWEET नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 10 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : 'कमी शिकलोय त्यामुळेच जास्त कमावतोय'; डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून व्हाल चकित
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement