हुश्श! ट्रेन पकडली; धावत धावत ट्रेनमध्ये चढला, पण आत जाताच प्रवाशाला मोठा धक्का

Last Updated:

घाईत पकडलेली ट्रेन काही वेळा प्रवाशांना अडचणीची ठरू शकते.  ईशान्य रेल्वेमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर प्रवाशांनी टीटीसमोर विनवणी करूनही काहीच फायदा झाला नाही.

प्रतीकात्मक फोटो/PTI
प्रतीकात्मक फोटो/PTI
नवी दिल्ली : आपण ट्रेनपासून काही अंतरावर असतो आणि त्याचक्षणी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलेली असते किंवा प्लॅटफॉर्मवरून निघण्याच्या तयारीत असते. अशावेळी धावत ट्रेन पकडणाऱ्यांची कमी नाही. धावत ट्रेन पकडणं धोकादायक आहे तरी अनेक जण ते करतात. असाच एक प्रवासी ज्याने धावत ट्रेन पकडली पण आत जाताच त्याला मोठा धक्का बसला.
अति घाई संकटात नेई असं म्हणतात. हेच रेल्वे प्रवासातही घडल्याचं दिसलं. घाईघाईत धावत का होईना पण एकदाचा मी ट्रेनमध्ये चढलो याचं समाधान मिळतं न मिळतं तोच पुढे दुसरं संकट आ वासून उभं राहिलेलं असतं. ईशान्य रेल्वेमध्ये अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यानंतर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला आणि पुन्हा अशी चूक न करण्याची शपथही त्यांनी घेतली.
advertisement
नेमकं घडलं काय?
ईशान्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सरस्वती चंद्र यांच्या मते, प्रवासादरम्यान महिलांची सुरक्षा ही भारतीय रेल्वेच्या प्राथमिकतांपैकी एक आहे. या क्रमवारीत रेल्वेकडून ऑपरेशन 'महिला सुरक्षा' मोहीम चालवली जाते. याअंतर्गत महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांवर अटकाव मोहीम राबवली जात आहे. 1 मे ते 15 मे 2024 या कालावधीत ऑपरेशन 'महिला सुरक्षा' अंतर्गत मोहीम राबवण्यात आली.
advertisement
किती प्रवाशांवर कारवाई
पूर्व मध्य रेल्वेच्या विविध विभागांवर महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एकूण 615 पुरुष प्रवाशांना रेल्वे संरक्षण दलाच्या पथकानं रेल्वे कायद्याच्या कलम 162 अंतर्गत ताब्यात घेतलं. यामध्ये दानापूर विभागात सर्वाधिक 355, पं. दीनदयाल उपाध्याय विभागात 151, सोनपूर विभागात 56 आणि समस्तीपूर विभागात 53 पुरुष प्रवाशांना ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली.
advertisement
विनवणी करूनही फायदा नाही
तपासादरम्यान सर्व प्रवासी वेगवेगळे तर्कवितर्क देत राहिले, काहींनी ट्रेन सुरू असल्याने डब्याकडे लक्ष दिलं नाही, तर काहींनी डब्याच्या बाहेर वाचता येत नसल्याचं सांगितलं. अशाप्रकारे प्रवासी टीटीकडे विनवणी करत राहिले, मात्र टीटीने काहीही न ऐकता त्यांना ताब्यात घेतलं.
मराठी बातम्या/Viral/
हुश्श! ट्रेन पकडली; धावत धावत ट्रेनमध्ये चढला, पण आत जाताच प्रवाशाला मोठा धक्का
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement