Indian Village : देशातलं असं गाव, भारतीयांपेक्षा परदेशींची लोकसंख्या जास्त, महिन्यांसाठी भाड्याने घेतात घर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतात असं एक गाव आहे जिथली भारतीयांपेक्षा परदेशी नागरिकांची लोकसंख्या जास्त आहे. परदेशी नागरिक या गावात अनेक महिन्यांसाठी खोली भाड्याने घेतात आणि तिथेच स्थायिक होतात.
मुंबई : भारतामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत, जिथे कायम राहावसं वाटतं, पण प्रवासी या ठिकाणी जातात आणि इच्छा नसतानाही परत त्यांच्या घरी येतात. पण भारतात असं एक गाव आहे जिथली भारतीयांपेक्षा परदेशी नागरिकांची लोकसंख्या जास्त आहे. परदेशी नागरिक या गावात अनेक महिन्यांसाठी खोली भाड्याने घेतात आणि तिथेच स्थायिक होतात.
इन्स्टाग्राम यूजर मोहम्मद अमन हा प्रवासी असून कंटेट क्रिएटर आहे, ज्याचे 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो भारतातील एका गावाला भेट देतो जिथे भारतीयांपेक्षा जास्त परदेशी आहेत. परदेशी नागरिक या गावात एक खोली भाड्याने घेतात आणि अनेक महिने तिथे राहततात. या गावाला भारतात मिनी इस्रायल असेही म्हणतात.
advertisement
advertisement
भारतातील परदेशी गाव
हे गाव हिमाचल प्रदेशातील धर्मकोट आहे. धर्मशालापासून 2 किलोमीटर वरच्या दिशेने हे गाव आहे. व्हिडिओमध्ये अमन गावात आला तेव्हा पाऊस पडत होता, त्यामुळे जास्त लोक दिसत नव्हते. पण, त्याच्या कॅमेऱ्यात कैद झालेले बहुतेक लोक परदेशी होते. इस्रायली नागरिक या गावाला सर्वाधिक भेट देतात, यासाठी ते खोल्या भाड्याने घेतात आणि महिनोंमहिने इथे राहतात. या गावामध्ये इटालियन, इस्रायली आणि इतर राष्ट्रांचे जेवण देणारे अनेक कॅफे आहेत.
Location :
Himachal Pradesh
First Published :
October 08, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Indian Village : देशातलं असं गाव, भारतीयांपेक्षा परदेशींची लोकसंख्या जास्त, महिन्यांसाठी भाड्याने घेतात घर!