Reels वेड्या लोकांसाठी नवीन फीचर बाजारात, कंपनीने मुख्य प्रॉब्लमच एकदाचा सोडवला
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Instagram ने यूजर्ससाठी एक अत्यंत उपयोगी आणि मजेदार फीचर आणलं आहे. ज्यामुळे युजर्सची रोजची कटकट संपली आहे.
मुंबई : आजच्या डिजिटल जगात सोशल मीडियाचं नातं आपल्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलं गेलं आहे. त्यातही Instagram हे तरुणांपासून ते क्रिएटर्सपर्यंत सर्वांचं आवडतं प्लॅटफॉर्म बनलं आहे. प्रत्येकजण रोज असंख्य Reels पाहतो, पण आवडलेली Reel नंतर पुन्हा शोधणं ही एक त्रासदायक गोष्ट ठरते. हा त्रास लक्षात घेऊन आता Instagram ने यूजर्ससाठी एक अत्यंत उपयोगी आणि मजेदार फीचर आणलं आहे. Watch History. या फीचरमुळे आता कोणतीही Reel पुन्हा शोधण्यासाठी स्क्रोलिंग करण्याची गरज नाही.
काय आहे Instagram Watch History फीचर?
या नव्या फीचरच्या मदतीने यूजर आता त्याने आधी पाहिलेल्या सर्व Reels एका ठिकाणी सहज पाहू शकतो. हे फीचर तुमच्या Profile > Settings > Your Activity या सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.
Instagram चे हेड ऍडम मोसेरी यांनी सांगितलं की, हा फीचर खास त्या वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना एखादी Reel आवडल्यावर ती चुकून स्क्रोल होऊन गेल्यामुळे पुन्हा सापडत नाही. आता तुम्ही तारीख, आठवडा किंवा महिन्याच्या आधारे तुमची Watch History फिल्टर करून पाहू शकता.
advertisement
TikTok सारखं, पण अजून Smart
Watch History फीचरचं स्वरूप थोडं TikTok सारखं आहे, पण Instagram ने यात अधिक फ्लेक्सिबिलिटी दिली आहे.
यूजर्स आता केवळ तारीख, क्रिएटर (author) किंवा कंटेंट टाइप नुसारच नाही, तर chronological किंवा reverse order मध्येही Reels पाहू शकतात.
याशिवाय Instagram ने यात अधिक फिल्टर्स आणि प्रायव्हसी कंट्रोल्स जोडले आहेत म्हणजेच तुम्हाला हवं असल्यास कोणतीही Reel तुमच्या Watch History मधून काढून टाकता येईल.
advertisement
Meta ची नवी रणनीती: Reels अधिक आकर्षक बनवणे
Meta सध्या Instagram च्या Reels प्लॅटफॉर्मला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे.
गेल्या काही महिन्यांत Instagram ने Reel Series Linking आणि Picture-in-Picture सारखी फीचर्स सुरू केली होती.
आता या Watch History फीचरमुळे Reels पाहण्याचा अनुभव आणखी सोपा आणि वापरकर्त्यासाठी सोयीस्कर झाला आहे.
advertisement
हे स्पष्टपणे दिसतंय की Meta, TikTokला टक्कर देण्यासाठी Instagram ला अजून आकर्षक आणि वापरण्यास सोपं बनवत आहे.
Watch History फीचरमुळे आता Instagram यूजर्सना त्यांच्या आवडत्या Reels पुन्हा पाहणं, सेव न करता, डाउनलोड न करता एका क्लिकवर शक्य होणार आहे. सोशल मीडिया लव्हर्ससाठी हा नक्कीच एक game-changing update ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 5:35 PM IST


