वर्ल्डकप प्रमाणेच IPL मध्येही विजेत्या टीमला नकली ट्रॉफी दिली जाते? 99 टक्के लोकांना माहित नसणार 'हे' फॅक्ट्स?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक असा प्रश्न उपस्थीत झाला आहे की "वर्ल्ड कपप्रमाणेच IPL मध्येही खेळाडूंना ‘रेप्लिका’ म्हणजेच नकली ट्रॉफी दिली जाते का?"
मुंबई : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 जूनला IPL च्या 18 व्या सिजनचा विजेता मिळाला आहे. फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि पंजाब किंग्स हे असे दोन संघ होते, ज्यांनी आजवर एकदाही खिताब जिंकलेला नव्हता. अखेर या सिजनची ट्रॉफी आरसीबीनं आपल्या नावे केली. विराट कोहली आणि त्याचे चाहाते, या विजयाने आनंदी झाले होते.
या विजयानंतर विराट आणि त्याच्या पलटनने IPL Trophy आपल्या हातात घेऊन जल्लोष साजरा केला. पण यावर एक असा प्रश्न उपस्थीत झाला आहे की "वर्ल्ड कपप्रमाणेच IPL मध्येही खेळाडूंना ‘रेप्लिका’ म्हणजेच नकली ट्रॉफी दिली जाते का?"
IPL ची ट्रॉफी केवळ सोनेरी दिसणारी नसून, तिच्यामध्ये सोने, चांदी, अॅल्युमिनियम आणि इतर धातूंचाही वापर आहे, असं म्हटलं जातं, पण बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती कधीच दिली नाही, पण ट्रॉफीची चमक आणि भव्यता पाहता तिच्यात उच्च दर्जाचे साहित्य वापरले गेलेलं असावं असा अंदाज लावता येतो.
advertisement
या ट्रॉफीचं वजन सुमारे 6 किलो असून तिची उंची सुमारे 26 इंच आहे.
एकच ट्रॉफी, पण रेप्लिका कोणाला?
IPL मध्ये फक्त एकच मूळ (original) ट्रॉफी असते. फायनल जिंकल्यावर सेरेमनी दरम्यान विजेत्या संघाला ही मूळ ट्रॉफी काही वेळासाठी दिली जाते. नंतर ही ट्रॉफी पुन्हा BCCI कडे परत जाते. त्याऐवजी विजेत्या संघाला रेप्लिका ट्रॉफी दिली जाते जी ते कायमस्वरूपी त्यांच्या क्लबमध्ये ठेवू शकतात.
advertisement
मूळ ट्रॉफीवर प्रत्येक वर्षी विजेत्या संघाचं नाव कोरलं जातं.
ट्रॉफीची किंमत किती?
IPL ट्रॉफीचं डिझाइन खूप खास आहे. त्यावर संस्कृत वाक्य "यत्र प्रतिभा अवसरं प्राप्नोति" असं कोरलेलं आहे, ज्याचा अर्थ – "जिथे प्रतिभेला संधी मिळते." या ट्रॉफीची अचूक किंमत जाहीर करण्यात आलेली नाही, पण तज्ज्ञांच्या मते ती 30 ते 50 लाख रुपयांदरम्यान असू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/Viral/
वर्ल्डकप प्रमाणेच IPL मध्येही विजेत्या टीमला नकली ट्रॉफी दिली जाते? 99 टक्के लोकांना माहित नसणार 'हे' फॅक्ट्स?