‘पाजी’ हा शब्द खरंच पंजाबी आहे? त्याचा नेमका अर्थ माहीत आहे का?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
पंजाबी भाषेतला हा शब्द बरेचदा आपल्या कानावर पडला असेल; पण त्याचा नेमका अर्थ माहीत आहे का?
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : रोजच्या बोलण्यात अनेक वेगवेगळ्या शब्दांचा वापर आपण करतो; मात्र त्यातल्या काही शब्दांचा खरा अर्थ आपल्याला माहीत नसतो. काही वेळेला ते शब्द इतर भाषांमधून आलेले असतात किंवा काही सामाजिक, भौगोलिक परिस्थितीशी जोडलेले असतात. असाच एक शब्द म्हणजे पाजी. पंजाबी भाषेतला हा शब्द बरेचदा आपल्या कानावर पडला असेल; पण त्याचा नेमका अर्थ माहीत आहे का?
भारतात विविध संस्कृतींचा मिलाफ खूप सुंदरपणे झाला आहे. त्यामुळे विविध भाषांमधले शब्द आपण जसेच्या तसे आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. त्यातही पंजाबी शब्दांचा आपल्यावर विशेष प्रभाव दिसतो. बॉलिवूडमुळे अनेक पंजाबी शब्द सामान्यांच्या कानांवर सतत पडत राहिले. त्यातला एक प्रमुख शब्द म्हणजे पाजी. कोणत्याही पंजाबी माणसाला भेटलं, की इतर माणसं त्याच्याशी बोलताना पाजी हा शब्द 8 ते 10 वेळा तरी वापरतात. या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?
advertisement
कोरा या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एकानं हा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर म्हणून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावर आलेल्या योग्य उत्तरांपैकी काही उत्तरांमधून या प्रश्नाचं नेमकं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
पाजी या शब्दाचा पंजाबीमध्ये अर्थ काय?
या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या एकाने सांगितलं, की हा शब्द खरं तर पंजाबी नाही. पंजाबच्या माझा आणि दोआबा या प्रांतात मोठ्या भावाला भाजी असं म्हटलं जातं. त्यावरूनच पाजी हा शब्द तयार झाला असावा असं त्यानं म्हटलंय. पंजाबीमध्ये “ਭ” (Pbh या प्ह) या अक्षरासाठी हिंदीमध्ये त्याच उच्चाराचं वर्णाक्षर नाहीये. त्यामुळे त्याचा उच्चार हिंदीमध्ये भ असा केला जातो. मोठ्या भावाला भाईजी असं म्हटलं जातं. पंजाबी अक्षराचं हिंदीमध्ये नीट उच्चारण होत नसल्यानं त्याला भाईजी, भाजी, प्रहाजी किंवा प्राजी असं म्हणतात. पाजी हा त्याचाच अपभ्रंश असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
advertisement
हा झाला पंजाबी भाषेतला अर्थ. हिंदीमध्ये मध्य भारतीय प्रदेशातही पाजी हा शब्द वापरला जातो; मात्र तिथे त्याचा अर्थ खोडसाळ, चंचल किंवा उपद्रवी असा घेतला जातो. खोडसाळ मुलांसाठीच विशेषतः हा शब्द वापरला जातो.
हिंदी आणि पंजाबी या दोन भाषांमध्ये पाजी या शब्दाचे दोन भिन्न अर्थ आहेत. यावरून भाषेतलं वैविध्य लक्षात येईल. यासारखे आणखीही काही शब्द आपल्या बोलण्यात असतात; मात्र त्यांचा अर्थ शोधण्याचा फारसा प्रयत्न केला जात नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2023 6:50 PM IST