Kitchen Jugaad Video : काय सांगता! तुटक्या-फुटक्या वस्तूही जोडतो; इनोचा असाही अनोखा वापर
- Published by:Priya Lad
Last Updated:
अॅसिडीटी-गॅसची समस्या, कुकिंग याशिवाय इनोचा आणखीही काही वापर असू शकतो याचा आपण कधी विचार तरी केला होता का? किंबहुना कुणी असं सांगितलं तरी विश्वास बसणार नाही. पण एका महिलेनं ते करून दाखवलं आहे.
नवी दिल्ली : इनो आपण कशासाठी वापरतो, असं विचारलं तर साहजिक अॅसिडीटी, गॅसची समस्या वाटली की आपण इनो पितो. इनोचा वापर कुकिंगमध्येही केला जातो. पण इनोचा आणखीही अनोखा असा वापर आहे, जो कुणाला माहितीच नाही. एका महिलेने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो.
अॅसिडीटी-गॅसची समस्या, कुकिंग याशिवाय इनोचा आणखीही काही वापर असू शकतो याचा आपण कधी विचार तरी केला होता का? किंबहुना कुणी असं सांगितलं तरी विश्वास बसणार नाही. पण एका महिलेनं ते करून दाखवलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. इनो तुम्ही एखाद्या ग्लूप्रमाणे वापरू शकता. म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या वस्तू तुम्ही याने जोडू शकता.
advertisement
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
आता इनोनं तुटक्या-फुटक्या वस्तू कशा जोडणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. व्हिडीओत महिलेनं दाखवल्यानुसार तिनं एक पाण्याचं प्लॅस्टिकचं भांडं घेतलं आहे, जे तळाला थोडं फुटलं आहे. प्लॅस्टिकची भांडी पडली की त्याला असेच तडे जातात, ते फुटतात. आता असं भांडं फुटलं की एकतर ते आपण फेकून देतो, नाहीत त्याला फेविक्विक वगैरे काहीतरी लावून ते पुन्हा वापरतो. पण तरी काही वेळा ते लीक होतं. याचा तोड आहे तो इनो, असं या महिलेनं सांगितलं आहे. तिनं ते करूनही दाखवलं आहे.
advertisement
महिलेनं व्हिडीओमध्ये हे भांडं जिथं फुटलं तिथं फेविक्विक लावलं, काही वेळ ते सुकू दिलं आणि नंतर त्यात पाणी टाकलं. पण फेविक्विक लावल्यानंतरही पाणी गळतच होतं.
फुटक्या भांड्यावर इनो लावताच झाली कमाल
यानंतर महिलेनं भांडं जिथं फुटलं, तिथं आधी इनो दाबून भरला. त्यानंतर या इनोवर तिनं फेविक्विक लावलं. सुकल्यानंतर तिनं त्यात पाणी ओतलं आणि काय कमाल झाली. तुम्ही पाहाल तर यातून एकही थेंब पाणी गळत नाही. फक्त फेविक्विक लावल्यानंतर पाणी गळतं पण इनो आणि फेविक्विक एकत्र लावल्यानं पाणी बिलकुल गळत नाही. आहे की नाही कमाल.
advertisement
अशा पद्धतीने तुम्ही घरातील कोणत्याही प्लॅस्टिकच्या वस्तू, भांडी जोडू शकता, असं या महिलेनं सांगितलं आहे.
advertisement
Smart woman tips Babita युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
First Published :
August 21, 2024 7:43 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : काय सांगता! तुटक्या-फुटक्या वस्तूही जोडतो; इनोचा असाही अनोखा वापर