Kitchen Juggad Video - किचनसाठी 'जादूची पोटली'; तांदळाच्या डब्यात नक्की टाका आणि पाहा चमत्कार
- Published by:Priya Lad
Last Updated:
किचन जुगाडाचा जबरदस्त असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : गृहिणींकडे काही ना काही जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड. ज्यात तिने किचनमध्ये वापरता येईल अशी जादूची पोटली दाखवली आहे. ही जादूची पोटली तिने तांदळाच्या डब्यात ही जादूची पोटली टाकली आणि कमालच झाली. या जादूच्या पोटलीने काय चमत्कार केला ते तुम्हीच पाहा. किचन जुगाडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
या पोटलीमध्ये असं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पोटलीत दुसरं तिसरं काही नाही तर पुदिना आहे. पुदिना कोरडा करून जशाच्या तसा एका मुलायम कापडात गुंडाळायचा आहे. तो तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे. काही दिवस नाही तर वर्षभर.
advertisement
आता याचा फायदा काय तर तांदूळ काही वेळा खराब होतात. तांदळाला कीड लागते. पण पुदिना कापडात गुंडाळून ठेवल्याने ती समस्या दूर होईल. तांदळाला कीड लागणार नाही. तांदूळ खराब होणार नाही. या सोप्या उपायाने अगदी वर्षभर तांदूळ टिकेल असा दावा या गृहिणीने केला आहे.
advertisement
Creator Search 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
Sep 29, 2023 8:00 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Juggad Video - किचनसाठी 'जादूची पोटली'; तांदळाच्या डब्यात नक्की टाका आणि पाहा चमत्कार








