नियंत्रण सुटताच कारचा भीषण अपघात; चालक चेंडूसारखा हवेत उडला अन्..., Shocking Video

Last Updated:

गाडी हवेत उडून अनेक वेळा पलटी होते आणि मग कोसळते. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी हवेत उडताच चालकही उडून गाडीच्या बाहेर पडला

भीषण अपघाताचा व्हिडिओ
भीषण अपघाताचा व्हिडिओ
नवी दिल्ली : रस्ते अपघाताच्या घटना रोजच समोर येत असतात. मात्र, यातील काही अपघात असे असतात ज्यांच्याबद्दल ऐकून किंवा पाहून इतरांचाही थरकाप उडतो. रस्ते अपघात कधीकधी इतके भीषण असतात की त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तर, कधीकधी या अपघातातून लोक अगदी मृत्यूच्या दारातून परत येतात. अशा घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यास त्यांचे व्हि़डिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या अशाच एक घटनेचा व्हि़डिओ समोर आला आहे.
कुवेतमधील एका भीषण कार अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अपघातात कारचालक मात्र चमत्कारिकरित्या बचावला आहे. मुबारक अल-कबीर गव्हर्नरेटमध्ये गेल्या शनिवारी ही घटना घडल्याचं वृत्त आहे. चालक अतिशय वेगात गाडी चालवत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर गाडी हवेत उडून अनेक वेळा पलटी होते आणि मग कोसळते. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी हवेत उडताच चालकही उडून गाडीच्या बाहेर पडला. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सुदैवाने इतका भीषण अपघात होऊनही चालकाला गंभीर दुखापत झालेली नाही.
advertisement
advertisement
व्हिडिओमध्ये दिसतं, की या अपघातानंतर तो उठून तिथून दूर जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना हे वाहन समुद्रकिनारी पलटी झाल्याचं दिसलं. यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. सध्या हे वाहन जप्त करण्यात आलं असून 34 वर्षीय चालकावर कारवाई करण्यात येत आहे. या अपघातात चालक बचावल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. @Kapyoseiin नावाच्या यूजरने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
एकाने कमेंट केली की, त्याने सेफ्टी बेल्टही घातला नव्हता. हे तर एखाद्या मुलाला खेळण्यासाठी चाकू देण्यासारखं आहे. तर इतरांचं म्हणणं आहे की, आता हा माणूस आपला वाढदिवस दोनदा साजरा करणार आहे, कारण हा त्याला मिळालेला दुसरा जन्मच आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की, जगात वेड्या लोकांची अजिबात कमतरता नाही. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या/Viral/
नियंत्रण सुटताच कारचा भीषण अपघात; चालक चेंडूसारखा हवेत उडला अन्..., Shocking Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement