पैसे, नोकरी आणि घर... सगळं गमावलं, पार्टीतील ती एक चूक व्यक्तीला भलतीच महागात पडली
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्या व्यक्तीचं नाव 'ली डॉलिंग' असं आहे. त्याने सोशल मी़डियावर आपल्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं.
मुंबई : नशा लोकांना कोणत्याही थराला जायला भाग पाडते. यामध्ये लोक कसलाही विचार करत नाहीत. ज्यामध्ये ते आपलं सर्वस्व देखील पणाला लावतात. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं. ड्रग्सच्या नशेत व्यक्तीने आपलं घर, पैसे आणि बायको सगळ्यांना गमावलं. त्यानंतर त्याला या गोष्टीची जेव्हा जाणीव झाली तोपर्यंत फार उशीर झाला होता.
ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्या व्यक्तीचं नाव 'ली डॉलिंग' असं आहे. त्याने सोशल मी़डियावर आपल्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. तो म्हणाला की एका पार्टीमध्ये त्याला ड्राग्स (कोकेन) दिलं गेलं, ज्यामुळे तो ड्रग्सच्या आहारी गेला.
44 वर्षीय लीने सांगितले की, त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते. आपली सवय पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या घरातील गोष्टी विकायला सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याच्या पत्नीने त्याला घराबाहेर हाकलून दिले.
advertisement
यानंतर जेव्हा ली त्याच्या आईच्या घरी गेला तेव्हा तिने ही त्याला घरातून हाकलून दिले. कारण ड्रग्ज घेण्यासाठी त्याने आईच्या घरातील वस्तू विकायलाही सुरुवात केली होती. ब्रिटनमध्ये राहणारा ली सांगतो की त्याला 2019 ते 2021 पर्यंत बेघर लोकांसाठी बांधलेल्या निवारामध्ये राहावे लागले.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, आपल्या व्यसनाबद्दल बोलताना ली म्हणाला, 'जेव्हा मी ड्राग्स घ्यायला सुरुवात केली, तेव्हा माझे लग्न झाले होते, माझे घर आणि करिअर होते, पण त्यानंतर मी बिले भरण्यासाठी घरी ठेवलेले पैसे चोरत होतो आणि घरातील वस्तू विकत होतो. माझ्यासोबत राहणे अशक्य झाले, म्हणून माझ्या पत्नीने मला घरातून हाकलून दिले आणि घटस्फोट घेतला.
advertisement
ली पुढे म्हणाला, 'मी माझ्या आईच्या घरी गेलो. मी जवळपास एक वर्ष तिच्यासोबत राहिलो. पण तिथेही मी आईला लुटलं, त्यांच्या घरातील वस्तू विकत होतो, त्यानंतर त्यांनीही मला हाकलून दिलं. मॅक्री सेंटरला येण्यापूर्वी मी नॉर्थवूडमधील एका मित्राकडे जवळपास एक आठवडा राहिलो.
यानंतर ली एका संस्थेत सामील झाले जी ड्रग्सच्या व्यसनाधीनांना राहण्याची व्यवस्था करते आणि या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करते. केस कापण्याचे कामही शिकले. आता ली केंद्रात राहून लोकांचे केस कापतो. यातूनच त्याची कमाई होत आहे. दोन वर्षांपासून त्याने ड्रग्ज घेतलेले नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2024 5:40 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पैसे, नोकरी आणि घर... सगळं गमावलं, पार्टीतील ती एक चूक व्यक्तीला भलतीच महागात पडली