मुलीला बर्थडे पार्टीमध्ये सोडून गेली आई, संध्याकाळी परत येताच जे दिसलं ते पाहून उडाला चेहऱ्याचा रंग
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पार्टीचं आयोजन करणाऱ्यांची जबाबदारी असते की त्यांनी आलेल्या गेस्ट मुलांची नीट काळजी घ्यावी आणि त्यांच्या आई-वडिलांनी येऊन त्यांना घेईपर्यंत त्यांचं योग्य लक्ष ठेवावं.
मुंबई : भारतात असो किंवा परदेशात, मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पालक मुलांना सोडून जातात हे अगदीच कॉमन झालं आहे. पालक आपल्या मुलांना त्यांच्या शाळेतल्या किंवा परिसरातील मित्र-मैत्रिणीच्या घरी बर्थडे पार्टीला हमखास सोडून जातात. मुलांना पार्टीचा आणि खाण्याचा आनंद घेऊ देतात आणि थोड्यावेळाने त्यांना आणायला येतात. अशा वेळी पार्टीचं आयोजन करणाऱ्यांची जबाबदारी असते की त्यांनी आलेल्या गेस्ट मुलांची नीट काळजी घ्यावी आणि त्यांच्या आई-वडिलांनी येऊन त्यांना घेईपर्यंत त्यांचं योग्य लक्ष ठेवावं.
पण एका बर्थडे पार्टीमधील अशी घटना समोर आली आहे की त्याबद्दल ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मुलीची आई जेव्हा आपल्या मुलीला बर्थडे पार्टीमध्ये आणायला आली तेव्हा तिला जे दिसलं त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नक्की असं काय घडलं? याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल?
खरंतर ही घटना अमेरिकेतील लॉरेन नावाच्या एका महिलेसोबत घडली. तिने तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलं. ती आपल्या मुलीला तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सोडलं. तिला वाटलं होतं की मुलगी मित्रमैत्रिणींबरोबर मजेत वेळ घालवेल. पार्टी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असल्याचं तिला सांगण्यात आलं होतं. पण जेव्हा लॉरेन 4.30 वाजता मुलीला घेण्यासाठी गेली, तेव्हा तिने पाहिलं की संपूर्ण खोली बंद होती, दिवे विझलेले होते आणि तिची मुलगी एकटी उभी होती. पार्टी आयोजित करणारी आईसुद्धा तिथून गायब झाली होती.
advertisement
लॉरेनने लगेच त्या महिलेच्या मोबाईलवर 8 वेळा कॉल केला आणि मेसेजेसही पाठवले, पण काही प्रतिसाद आला नाही. नंतर तिथल्या मॅनेजरने सांगितलं की पार्टी आयोजित करणारी महिला आणि इतर सगळे लोक दीड तास आधीच निघून गेले होते.
जेव्हा लॉरेनने आपल्या मुलीला विचारलं की तिने काही खाल्लं का, तेव्हा तिने सांगितलं की “नाही. तिथे ना काही खायला दिलं, ना केक कापला गेला, आणि ना गिफ्ट उघडले गेले.” हे ऐकून लॉरेन पूर्णपणे हादरून गेली. तिचं म्हणणं होतं की तिने त्या महिलेवर विश्वास ठेवून मोठी चूक केली. यामुळे तिने आपल्या मुलाल भूकं ठेवलं होतं आणि बऱ्याच वेळापासून एकटं ही ठेवलं होतं, हे जे काही घडलं त्यामागे तिचीच चुक आहे असं महिलेनं मानलं.
advertisement
लॉरेनने आपला अनुभव टिकटॉकवर शेअर केला आणि म्हटलं "मला वाटतंय की मी सर्वात वाईट आई आहे." यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. अनेकांनी लॉरेनच्या अनुभवाला पाठिंबा दिला. एका यूजरने लिहिलं "मुलांना पार्टीमध्ये सोडणं सामान्य आहे, पण सर्व मुलं घरी जाईपर्यंत होस्टने थांबणं गरजेचं आहे. हे वर्तन अतिशय गैरजबाबदार आहे."
दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं "त्या आईला नीट माहिती होतं की ती काय करत आहे. ही काही चूक नव्हती." मात्र काहींनी असा अंदाज व्यक्त केला की कदाचित या गोष्टीचा दुसरा बाजूही असू शकतो. अशी धक्कादायक बातमी वाचून अनेक पालकांनी आपल्या मुलांना पार्ट्यांमध्ये सोडताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असा विचार सोशल मीडियावर व्यक्त केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 10:06 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मुलीला बर्थडे पार्टीमध्ये सोडून गेली आई, संध्याकाळी परत येताच जे दिसलं ते पाहून उडाला चेहऱ्याचा रंग


